आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली,उष्माघात प्रतिबंधात्मक उपायोजना आढावा बैठक !
जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका भगिनींना देखील दिल्या शुभेच्छा !
मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून काही ठिकाणी उष्माघाताने बळी जाण्याचे चिंताजनक प्रकार वाढलेले आहेत. त्यातच काही नागरिकांना काळजी न घेतल्यामुळे उष्माघाताचा फटका बसून गंभीर स्वरूपाच्या व महगड्या उपचारांना सामोरे जावे लागत असल्याने या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे उष्माघात संदर्भात काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तात्काळ योग्य उपचार ह्या विषयी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेवून काही महत्त्वाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत. तसेच उष्माघाताचा ची लक्षणे जाणवताच नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय किंवा जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जावून तातडीने उपचार करावेत असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
सदरील आढावा बैठक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षते खाली पार पडली असून यावेळी तहसीलदार श्वेता संचेती ,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे,इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते ,
तसेच आज दि.१२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व सेवा भावी परिचारिका भगिनी यांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्या करीत असलेल्या कार्याचे गोड कौतुक केले सोबत शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, , मुक्ताईनगर , बोदवड तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर्स , परिचारिका आणि रुग्णालय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
मुक्ताई वार्ता Muktai Varta
Chandrakant N Patil
मुक्ताईनगर – Muktai City Group