आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश…
रावेर पातोंडी ते नायगाव वढोदा रस्ता काँक्रीटीकरण मंजुरी दिशेने , सर्वेक्षण व प्रस्तावासाठी ४३.६३ लक्ष रू.निधीची तरतूद
मुंबई : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश , रावेर पातोंडी पिप्रीनांदू नायगाव डोलारखेडा कुन्हा वढोदा रस्ता रामा ४७ किमी ०/०० ते ६४/९०० ची सुधारणा करणे. (अंदाजित रक्कम ४५० कोटी रुपये) या रस्त्याच्या काँक्रीटीकरण बांधकामासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू होता.या पाठपुराव्याला यश आले असून अर्थसंकल्प २०२३ मध्ये या रस्त्याच्या सर्वेक्षण व प्रस्ताव तयार करण्यासाठी ४३ लक्ष ६३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून लवकरच आमदार चंद्रकांत पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या रस्त्याचा मंजुरीचा देखील मार्ग मोकळा झालेला आहे.