आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश,
सामाजिक न्याय विभागातून मतदार संघातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर !
संत मुक्ताईनगर : भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन 2022-23 या वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विविध विकास कामांसाठी 5 कोटी रु. निधी सह मंजुरी मिळाली असून आमदार चंद्रकांत पाटील पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.यासंदर्भात सामाजिक न्याय विकास विभाग , शासन निर्णय क्रमांक : सावियो 2023 प्र.क्र./अजाक मुंबई दि.8 फेब्रुवारी 2023 अन्वये परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे.
खालील नमूद गावांमध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे बुद्ध विहार, सुशोभीकरण , सामाजिक सभागृह , स्मशानभूमी बांधकाम , काँक्रीटीकरण, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुशोभीकरण , रस्ता व गटार बांधकाम अशी कामे मंजूर झालेली आहे.
मस्कावद सिम, मस्कावद बू, , मस्कावद खू. , ऐनपुर, तांदलवाडी , कांडवेल, पुरी , गाते, पिंप्री पंचम, कर्की, नायगाव, हरताळे, सालबर्डी, कोथळी, वढोदा, हलखेडा, सुळे, काकोडा, उचंदा, मेळसांगवे, चिंचोल, अंतूर्लि, तरोडा, कुंड, बोदवड, वाकी, बोरगांव, धुळे, घोडसगाव, चिचखेडा बू, खामखेडा, चांगदेव, धामणगाव, पातोंडी, मानेगाव, भोटा, पारंबी, कुऱ्हा, काकोडा, साळशिंगी, नाडगाव, कुऱ्हा हरदो, मनुर बू, मानमोडी, शेलवड, विचवा, घानखेड, हिंगणे, जलचक्र, लोणवाडी, येवती, एनगाव, गाते, राजुरा या गावातील वरील नमूद विकास कामे एकूण 5 कोटी रु. निधीसह मंजूर झाली आहे.