आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश,
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र.२ नाबार्ड अंतर्गत मुक्ताईनगर मतदार संघातील रस्त्यांसाठी ८.९० कोटी रु. मंजूर
मुक्ताईनगर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ नाबार्ड मालिका २८ अर्थसहाय्य अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय देण्याबाबत मान्यता मिळालेली असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभाग ,शासन निर्णय क्रमांकः मुग्रायो-२०२२/प्र.क्र.५६९/बांधकाम-४ बांधकाम भवन, ५ वा मजला, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई ४०० ००१ तारीख: १ फेब्रुवारी, २०२३ रोजी जाहीर झालेल्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ च्या नाबार्ड मालिका-२८ अर्थसहाय्य अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी त्याच्या नावासमोर दर्शविलेल्या किंमतीस नमुद केलेल्या अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता मिळालेली असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केलेल्या पाठपुराव्याने मतदार संघातील दोन रस्ते सुमारे ८.९० कोटी रु. निधीसह मंजूर झालेले आहे.
या रस्त्यांना मिळाली मंजुरी
१) मुक्ताईनगर – रा.म.मा.०६ ते भांडगुरा रस्ता (भाग लांबी सातोड – तरोडा- भांडगुरा ते तालुका हद्द रस्ता) VR -२१ (लांबी ७.२१० कि.मी.) ( अंदाज पत्रकिय किंमत ५.४० कोटी रु.)
२) रावेर – रामा ०४ वाघोदे बू. ते कोचुर – सावखेडा – लोहारा रस्ता (TR- ०४, VR -८१६३,२५ ) यातील वाघोदे बू ते कोचर रस्ता (लांबी ३.५० किमी) (अंदाज पत्रकीय किंमत ३.५० कोटी रु.)