आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी,
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत ॲम्युजमेंट(वाटर) पार्क १० कोटी रु. निधीसह मंजुर
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना तसेच वृद्धांना जॉगिंग, फिरण्यासाठी आणि बालकांना खेळण्यासाठी , युवकांचे आरोग्य सदृढ होण्यासाठी येथे ॲम्युजमेंट(वाटर)) पार्क व्हावे यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली होती. यानुसार येथे मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत ॲम्युजमेंट पार्क १० कोटी रु. निधीसह मंजुर करण्यात आले आहे. अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.




ॲम्युजमेंट(वाटर) पार्क हे असणार :
या ॲम्युजमेंट(वाटर) पार्क मध्ये जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक, स्केटिंग रिंग, तरुण खेळाडूंसाठी खेळण्यासाठी मॅट, लहान मुलांसाठी खेळणी, एम्पी थियेटर, विद्युत दिवे, बसण्यासाठी आसन , योगा केंद्र, तसेच ओपन जीम, आकर्षक झाडे झुडपे, निसर्गमय वातावरण असते.परिसरातील नागरिकांसाठी जॉगिंग तसेच फिरण्यासाठी येथे व्यवस्था होत असते. त्यामुळे या धर्तीवर असे अद्ययावत वाटर पार्क मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या दूरदृष्टीे तून साकारणार आहे.