Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटील धावले अपघात ग्रस्ताच्या मदतीला 

जखमीला स्वतःच्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल  

Admin by Admin
June 4, 2022
in जळगाव
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार चंद्रकांत पाटील धावले अपघात ग्रस्ताच्या मदतीला

जखमीला स्वतःच्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल 
मुक्ताईनगर : मतदार संघातील दैनंदिन  कार्यक्रम आटपून  मुक्ताईनगरकडे परतीच्या प्रवासात असलेले  आमदार चंद्रकांत पाटील  राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील हरताळा फाट्याजवळ ॲपे तीन चाकी गाडीचा अपघात होऊन ते वाहन रस्त्याच्या कडेला पडलेले दिसून आले तसेच वाहन चालक शेजारीच जखमी स्वरूपात पडल्याचे पाहून त्यांनी वाहून थांबवले आणि लागलीच जखमी व्यक्तीला आस्तेवाईकपणे विचारपूस केली आणि सदरील जखमीला तात्काळ स्वतःच्या वाहनात बसवून मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालय गाठले आणि जखमीवर तातडीने उपचार करून घेतले. रणरणत्या उन्हात जखमी कासावीस होऊन रस्त्याच्या कडेला मदतीच्या अपेक्षेने पाहत असताना अशा वेळी कोणीच वाहन थांबवीत नसल्याने आशा मावळलेल्या जखमींच्या मदतीसाठी चक्क आमदारच धावून आल्याने पुढील अनर्थ टळला असून सदरील जखमी व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे आमदारांनी स्वतः विचारले असता जखमी ने तो सालबर्डी ता. मुक्ताईनगर येथील असल्याचे व त्याचे नाव रामभाऊ भाकरे आहे असे सांगितले. आमदारांनी लागलीच सालबर्डी येथील त्याच्या कुटुंबीयांना कळविले.
       दरम्यान , आमदार चंद्रकांत पाटील हे विद्यार्थी दशेपासून च अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांना वेळेवर उपचार मिळवुन देण्यासाठी अग्रेसर असायचे यामुळे अनेक अपघात ग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी धडपले आहेत तसेच कोरोना संकट काळात तर त्यांची कामगिरी व सजगता यामुळे मतदार संघातील हजारो रुग्णांचे जीव वाचलेले असल्याने यामुळे ते  केवळ आरोग्य दुत नव्हे , तर देवदूत ठरलेले आहेत.
Previous Post

शंकर टेमघरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार जाहीर

Next Post

मुक्ताईनगर येथे मल्टी पर्पज सभागृह मिळावे मराठा समाजा च्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी 

Admin

Admin

Next Post
मुक्ताईनगर येथे मल्टी पर्पज सभागृह मिळावे मराठा समाजा च्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी 

मुक्ताईनगर येथे मल्टी पर्पज सभागृह मिळावे मराठा समाजा च्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group