आमदार चंद्रकांत पाटलांनी जिल्हा नियोजनला धरले धारेवर, बोदवड तहसिल कार्यालयात 07 तलाठ्यांची नियुक्ती …!
बोदवड :- अमोल व्यवहारे
मुक्ताईनगर मतदार संघातील तहसिल कार्यालय बोदवड अंतर्गत तालुक्यातील सजांवर तलाठ्यांची 21 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 12 तलाठी कार्यरत होते. तलाठ्यांच्या 09 जागा रिक्त होत्या. यामुळे नागरिकांना विविध दाखले व नोंदिंसाठी वणवण भटकावे लागत होते. त्यातच अतिरिक्त कार्यभार सांभाळून तलाठीही मेटाकुटीस आलेले होते. यासाठी गेल्या काही दिवसांपासून या रिक्त जागा भरण्या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन दरबारी तगादा लावला होता. जिल्ह्यातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात सर्वच आमदार व जिल्हा प्रशासनाकडून राज्यस्तरावर मागणी होत होती. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन मध्ये रिक्त जागांचा पाढा वाचून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरल्याने,यावर उत्तर देत जिल्हाधिकारी म्हणाले की,मागील काळात तलाठी भरतीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी तब्बल 07 तलाठ्यांची बोदवडला ‘दि. 25 जुलै 2024 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पुर्वी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती दिली.
यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, आमदार चंद्रकांत पाटिल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व इतर आमदारांच्या उपस्थितीत सदरील बोदवड तालुक्यातील रिक्त असलेल्या सजांवर तब्बल ७ तलाठ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.