आदिशक्ती श्री. संत मुक्ताई ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यासाठी पांडुरंग पालखी सोहळ्याचे २३ मे रोजी होणार प्रस्थान
श्री संत मुक्ताबाईंचा बुधवार दि.२५ मे रोजी ७२५ वा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अंतर्धान समाधी सोहळा आहे.
पंढरपूर / मुक्ताईनगर
टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या ७२५ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे दि.२३ मे सोमवारी रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले. पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी हा सोहळा औरंगाबाद मुक्कामी असणार आहे .तर दि.२४ मे मंगळवारी रोजी भुसावळ येथे विठ्ठल मंदिर वार्ड येथे मुक्काम व दि.२५ मे बुधवारी रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे आगमन, दिंडी व दर्शन सोहळा दि.२६ मे गुरूवारी जुनी कोथळी ते नवीन मुक्ताई मंदिर पालखी व दिंडी सोहळा , दि.२७ मे शुक्रवारी द्वादश पारणे, नैवेद्य व परतीचा प्रवास, चिखली येथे मुक्काम, दि.२८ मे शनिवारी बीड येथे मुक्काम, दि.२९ मे रविवारी स्वस्थानी पंढरपूर येथे पालखी सोहळ्याची सांगता अशा स्वरूपात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती , पंढरपूर तर्फे पालखी सोहळ्याची रूपरेषा
तयार करण्यात आलेली आहे . असे पालखी सोहळा पालखी तथा महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी कळविले.

*********************
श्री संत मुक्ताबाईंचा बुधवार दि.२५ मे रोजी ७२५ वा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अंतर्धान समाधी सोहळा आहे. या समाधी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव आदि संत उपस्थित होते असे अभंगात वर्णन केले आहे. याप्रमाणे संत नामदेवांच्या पादुका घेवून नामदेव महाराजांचे वंशज गेली शेकडो वर्षे या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प.गुरूवर्य केशवदास नामदास महाराज पंढरपूर यांचे येथे समाधी सोहळ्याचे किर्तनही होते.