आदिशक्ति संत मुक्ताई साहेबांचा घटस्थापना दिनी मोठ्या उत्साहात पारायण व पुष्पवृष्टीने साजरा झाला जन्मोत्सव ! श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात हजारो भाविकांनी केले श्री दुर्गा सप्तशती ,मुक्ताई विजय ग्रंथाचे पारायण व पुष्पवृष्टीने केला मुक्ताई साहेबांचा जागर
मुक्ताईनगर : हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा व प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय श्रद्धेचा असलेला नावत्रोत्सव सण उत्सवास आज दि.२६ सप्टेंबर सोमवार पासून सुरुवात झालेली असून या परंपरेला आणखी एक ऐतेहासिक विषय जोडलेला असून संत परंपरेतील संत ज्ञानेश्वरादी चौघे भावंडात अतिशय लडिवाळ भगिनी असलेल्या परंतु तितक्याच मोठ्या अधिकार असलेल्या तसेच “कडाडली निरंजनी जेव्हा, मुक्ताई गुप्त झाली तेव्हा” या संत निळोबाराय यांच्या लिखित अभंग वाणीनुसार संत मुक्ताई या आदिशक्ती (ज्या नंदीपगृही जन्मुन बाल कृष्णाच्या अदलाबदलीत दुष्ट कंस राजाच्या हातातून निसटून कडकडून विजेच्या रुपात विलीन झाल्या होत्या) असल्याचे तत्कालीन असंख्य संत मंडळीचे दाखले आहेत.अशा या मुक्ताई साहेबांचा जन्मदिन सुद्धा अश्विन शु.प्रतिपदा (घटस्थापना) याच दिनी असल्याने नवरात्रीच्या पहिल्या माळेचे आई साहेबांचा ७४३ वा. जन्मसोहळा याचे औचित्य साधून तापी पूर्णा परिसर श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे हजारोंच्या संख्येत उपस्थित राहून सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान मोठ्या उत्साहात श्री दुर्गा सप्तशती पारायण , संत मुक्ताई विजय ग्रंथ पारायण सोहळा पार पाडून आई साहेबांच्या जन्मोत्सव अध्याय दरम्यान पुष्पवृष्टी व नाम गजर करून आई साहेब मुक्ताई यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
_________________________________
पारायण सोहळ्याने आले मुक्ताई मंदिर परिसरात नवचैतन्य :
आई साहेब मुक्ताई यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील हजारो महिला घरच्या घटस्थापना , व भगवती च्या आगमनाच्या कामांची लगभग असताना देखील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मार्गदर्शक परम पूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवकरी परिवारातर्फे केलेल्या एका आवाहनात हजर झाल्या होत्या. मोठ्या उत्साहात येथे पारायण सोहळा पार पडला. संत मुक्ताई च्या जन्मोत्सव अध्यायात पुष्प वृष्टी करताना भाविकांचे आनंदाश्रू आणि आई साहेब मुक्ताई यांचा प्रफुल्लित चेहरा तसेच भक्तिमय वातावरण नवचैतन्याचे आनंदाचे झरे वाहताना येथे दिसत होते. यावेळी संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांनी संत मुक्ताई मंदिर परिसर सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सेवेकरी व भाविकांतर्फे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे आभार मानण्यात आले.


_______________________________
आदिशक्ति च मुक्ताई येथे असल्याने या ठिकाणी दररोज पारायण सेवा करण्याचे आवाहन :
संत परंपरेतील मोठा अधिकार असलेल्या आदिशक्ती मुक्ताई या संपूर्ण मुक्ताई नगर च्या अधिष्ठान असल्याने त्याच्यातच साडेतीन शक्ती पिठाचे देवत्व असल्याने सेवेकरी व भाविकांनी नवत्रोत्सव पर्वात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत श्री दुर्गा सप्तशती पारायण सेवा करण्याचे आवाहन सेवा मार्गाचे श्री पुरुषोत्तम वंजारी, मुक्ताई मंदीराचे व्यवस्थापक ह.भ. प. उद्धव जूनारे महाराज व ह.भ.प दुर्गा संतोष मराठे(किर्तनकार) यांनी केले.
___________________________________
मुक्ताई साहेबांच्या जन्मोत्सवाचे छोटेसे बॅनर ही लावण्यास लोक प्रतिनिधी, समाज सेवी संस्था यांनी तसदी घेतली नाही. एरव्ही वाढदिवस असतील किंवा राजकीय घडामोडी यावर बॅनर बाजी होताना दिसून येथे परंतु मुक्ताईनगर तालुक्याचे वैभव असलेल्या आदिशक्ती मुक्ताई यांच्या जन्मोत्सवाचे छोटेसे बॅनर देखील कोणाकडून लावण्यात आले नाही. त्यामुळे मुक्ताईनगर कर यांनी उदासीनता आपल्या भूषण असलेल्या मुक्ताई प्रती येथे दिसून आली.
(मुक्ताई वार्ता संपादक स्वतः लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे देखील बॅनर झळकले नाही)
___________________________________
https://youtu.be/8VwMIQvtk-I
