आता या मोठ्या शहरात होणार, पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा !
दि.२ ते ८ फेब्रुवारी असेल भक्तिमय वातावरण !!
बुऱ्हाणपूर : नवीन वर्ष २०२३ मधील दुसऱ्या फेब्रुवारी महिन्यात बुऱ्हाणपूर शहरात भक्तीचे भाव तरंग वाहणार असून संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे.येथे आंतर राष्ट्रीय कथा वाचक प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) यांच्या श्रीमुखातून शिव महापुराण कथा भाविकांना श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून नुकतेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गर्दीचा उच्चांक पाहता बुऱ्हाणपूर शहर देखील गर्दीचा उच्चांक या कथेतून मोडणार असे चित्र दिसून येत असून कथेच्या आरंभ कधी होणार हीच आस भाविकांना लागलेली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातून लाखो भाविक कथेचा लाभ घेण्याची चिन्हे :
मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे होत असलेल्या या शिव महापुराण कथेला जितक्या संख्येने मध्यप्रदेशातून भाविकांचा जनसागर लोटनार ,त्याच पटित महाराष्ट्र राज्याच्या सीमा वर्ती भागातील म्हाजेच मुक्ताईनगर ,रावेर व यावल तालुक्यातील तसेच भुसावळ व बोदवड तसेच जामनेर व मलकापूर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांतून भाविकांचा अलोट जनसागर या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्रीमुखातून निघालेल्या वाणी वाक पुष्पाद्वारे कथा श्रवणाचा लाभ घेतील कारण या परिसरात “एक जल लोटा” हे प्रदीप मिश्रा यांचे मार्गदर्शनातून शिव पूजनाचा अनुकरणीय भाग सर्विकडे दिसून येत आहे. त्यामूळे मिश्रा यांच्या कथेची सर्वांना आस लागलेली आहे.
“जहां मनुष्य की मनुष्य से दूरियां न हो, जहां जाति का भेद न हो, जहां अहंकार न हो वहीं भोलेनाथ अपनी कृपा बरसाते है।”
बुऱ्हाणपूर ( ब्रह्मपुर) हे ऐतेहासिक दृष्ट्या असे पुण्य क्षेत्र आहे की, या क्षेत्राच्या ३०० किलोमिटर च्या परिघात चार ज्योतिर्लिंग आहेत. ५००.६ किलोमिटर परिघात १२ ज्योतिर्लिंगांपैकी सुमारे ६ ज्योतिर्लिंगांनी वेढलेला हा पवित्र पुण्य परिसर आहे.
कार्यक्रमाचे नियोजन
श्री शिव महापुराण कथा समिति अध्यक्ष माधव बिहारी अग्रवाल, कार्यकारी अध्यक्ष किशोर पाटिल सुुखपुरी, प्रशासनिक प्रमुख अतुल पटेल, ओम प्रकाश शर्मा, कोषाध्यक्ष सुरेश श्रॉफ तसेच सर्व समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रमाचे शिव धनुष्य पेलत असून ठीक ठिकाणच्या वेगवेगळ्या व्यवस्था राखून कार्यक्रम नियोजनासाठी ५१ पेक्षा जास्त विविध समित्यांचे गठण करण्यात येत आहे.