अरेच्चा… पुरनाड फाट्यावरील संस्थेच्या मान्यतेवर सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर धाड
साडे तेरा लाखांच्या ऐवजासह १५ जुगारी विरुद्ध गुन्हा दाखल !
(फोटो कॅप्शन : पोलिस स्थानकात जप्त केलेली दोघे वाहन शेजारी पोलिस जीप)
मुक्ताईनगर : – तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळील रावसाहेब हॉटेलच्या मागे संस्थेच्या मान्यतेवर सर्रासपणे अवैधरित्या सुरू असलेल्या पत्ता जुगाराच्या अड्ड्यावर जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून साडे तेरा लाखांचा ऐवज जप्त करून १५ जुगारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धाडसी कारवाई ६ जून २०२२ सोमवार रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिंथा , मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पोलिसांचे उपस्थितीमध्ये सोमवारी मध्यरात्री एक वाजता सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा फाट्याजवळील रावसाहेब हॉटेल च्या मागे असलेल्या अवैध रीत्या सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लब वर धाड टाकण्यात आली . यात सदर हॉलमध्ये जमाव झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. या छाप्यात जुगार खेळणाऱ्यांजवळ १ लाख ७० हजार २२० रूपयांच्या रोकडसह तीन चारचाकी, दोन दुचाकी, १३ स्मार्टफोन, पत्त्यांच्या कॅटसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली. याचे एकूण मूल्य हे १३ लाख ५२ हजार २२० रूपये इतके आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस पथकाने संजय गजमल मराठे, (वय ३९ रा पुर्णाड); गजानन भिमराव सोनवणे, ( वय ५९ रा. मुक्ताईनगर) , संतोष नथ्थु खुरपडे (वय ३३ रा मुक्ताईनगर ); कैलास वासुदेव जाधव, ( वय ३८ रा वडोदा ता मुक्ताईनगर); विजय नारायण परगरमोर, (वय ४२, रा शेगाव जि. बुलडाणा) ,मोहम्मद आसिफ मोहम्मद ताहीर, (वय ३७ रा. शेगाव ); रविंद्र सदाशिव शिरोडकर (वडोदा ता. मुक्ताईनगर ); मोहम्मद मोहसिन खान (वय ४०, रा शेगाव); गजानन मनोहर शंखे, (वय ४०, रा शेगाव); महादेव धनसिंग राठोड, ( वय ४१ रा. कान्हेरी गवळी ता. बाळापुर जि. अकोला) , सिताराम प्रल्हाद पारसकर, वय (५२, रा भोटा ता नांदुरा जि. बुलडाणा); अनिल नामदेव कोळी, (वय ५० रा टहाकळी); राजेश सिताराम वाकोडे, (वय ५० रा नांदुरा), सुरेश रामदास लोखंडे, (वय २९ रा. वडोदा) , जितेंद्र सुभाष पाटील (रा. विटवा, ता. रावेर) 15
संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रात्री दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक विकास नायसे यांच्या फिर्यादीवरून 15 जणांच्या विरूध्द महाराष्ट्र जुगार ऍक्टमधील कलम ४ आणि ५ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे हे करीत आहे.
पथकामध्ये जळगावचे डीवायएसपी कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार संजय पवार, विनोद सोनवणे, धर्मेंद्र ठाकूर ,मोतिलाल बोरसे ,सचिन जाधव, मुकेश घुगे, रवींद्र धनगर, सुरेश पाटील यांचा समावेश होता
****************
पुरनाड फाटा परिसरातील जुगार अड्डयांवर अनेकदा कारवाई करण्यात आली असली तरी याचा पूर्ण बंदोबस्त होत नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर पोलिसांच्या या कारवाईमुळे नंबर दोनच्या मंडळीचे नक्कीच धाबे दणाणले आहे.
**** उसामा जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन उपशाखा पूर्णाड तालुका मुक्ताईनगर शाखेचे अध्यक्ष व सचिव यांचा आरोपीता मध्ये समावेश आहे. त्यामुळे आता त्या संस्थेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिस कारवाईतून दिसून येत असल्याने संबंधित संस्थेच्या मान्यतेला कारवाईची टाच बसणार का ? याबद्दल चर्चांना उधाण आलेले आहे.
******************
जुगारी राजकीय पदाधिकारी गेले कुठे ? –
एरव्ही येथे एका राजकीय पक्षाच्या जनमानसात लोकनेते म्हणून मिरासदारी मिरवणाऱ्या नेत्याच्या राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तीचा हा जुगारी अड्डा असल्याची चर्चा असून मध्यंतरी उसामा जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन उपशाखा पूर्णाड तालुका मुक्ताईनगर शाखेचे अध्यक्ष जितेंद्र सुभाष पाटील व सचिव संजय गजमल पाटील यांनी संस्थेच्या नावाने एका वृत्तपत्रात जाहिरात देवून या ठिकाणी जुगाऱ्यांना जुगार खेळण्यासाठी आवाहन करण्यासाठी बे संस्काराची शाळाच भरविल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती विशेष म्हणजे या जाहिरातीत सभासद नी नोंदणीचे आवाहन करून जुगाऱ्यांना पूर्ण पोलिस परवानगीने जुगारी अड्डा सुरू केला असल्याचा आविर्भाव यातून दिसून येत होता परंतु येथे पोलिसांनी केलेली धाडसी कारवाई आणि कारवाईत अध्यक्ष व सचिव अडकले यातून जुगाऱ्याणा हा अड्डा देखील असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. परंतु येथे अनेक राजकीय पुढारी जुगार खेळण्यासाठी दररोज हजर असतात परंतु मध्यरात्री झालेल्या कारवाईत एकही राजकीय पुढारी आढळून आला नसल्याने कारवाई त्यांना अभय देण्यात आले की काय अशी चर्चा होत आहे.