Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

अरेच्चा…!  जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, चक्क जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम 

Admin by Admin
July 6, 2024
in जळगाव
0
अरेच्चा…!  जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, चक्क जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अरेच्चा…!  जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी,
चक्क जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम
*रुईखेडा शाळेचा विद्यार्थी झळकला गुणवत्ता  यादीमध्ये*
 *फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद मराठी शाळा रुईखेडे येथील विद्यार्थी शिवम कांता गवळी हा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण भागातून मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम आल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम सनानसे व रुईखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच उषा गुरचळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थीनी आचल गोपाळ चौधरी हिचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शालेय वेळा व्यतिरिक्त जादा तास घेऊन तयारी करून घेणाऱ्या वर्गशिक्षिका श्रीमती निता राजीव काकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम सनानसे, अजय गुरचळ, विद्यार्थ्याचे पालक कांता गवळी, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भागवत गाढे, शिक्षक प्रमोद दुट्टे व इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते. ग्रामीण भागातून पहिला आल्याने गुणवंत विद्यार्थी, आणि मेहनत घेणाऱ्या वर्गशिक्षिका यांचे शिक्षण विभाग व ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
———————————————–
जिल्हा परिषद शाळेने,ग्रामीण भागातील हिऱ्याला दिली चकाकी-
साधारणतः सर्विकडे पालकांचा महागडी फी भरून इंग्लिश स्कूल माध्यमांमध्ये पाल्यांना शिक्षण देण्याचा कल वाढला आहे.(आणि याचे अनुकरण करून कर्जबाजारी होणाऱ्या गरीब पालकांचाही) परंतु या पालकांच्या अपेक्षांना इंग्लिश माध्यमांच्या शाळा खऱ्या उतरत नसून अनेक इंग्लिश माध्यमांचा मुलांना ना धड इंग्लिश येते आणि ना धड मराठी , त्यामुळे “एक ना धड, भाराभार चिंध्या” अशी परिस्थिती शिक्षणाची झाली असून सर्विकडे केवळ शिक्षणाचा बाजार मांडल्याचे चित्र आहे. परंतु या महागड्या शिक्षणाला आवाहन देण्याचे कार्य काही जिल्हा परिषदेचे शिक्षक करीत असून गोरगरिबांची मुले यांना शिक्षणाच्या उच्च प्रवाहात आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असल्याचे दिसून येते. असेच काहीसे मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी चंग बांधलेला दिसून येत असून नुकतेच, फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी शिवम कांता गवळी हा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण भागातून मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम आला याच्या खऱ्या यशाचे श्रेय जाते ते विद्यार्थ्यासह जि.प.शाळेच्या वर्गशिक्षिका श्रीमती निता राजीव काकर यांना व शिक्षक प्रमोद दुट्टे यांना कारण शाळेची वेळ संपल्यानंतरही 2 ते अडीच तास जास्तीची वेळ देवून आपला विद्यार्थी शिष्यवृत्तीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला पाहिजे हा ध्यास बाळगून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आपल्या विद्यार्थ्याला जिल्हास्तरीय परीक्षेत चांगल्या गुणांनी तालुक्यातून प्रथम आणले. हे यश महागड्या शिक्षणाचा बाजार मांडलेल्यांच्या थोबाडीत मारल्यासारखे झालेले दिसून येत  असून जिल्हा परिषद शाळेने मिळविलेले हे यश नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारे आहे.
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar NewsScolersheepZP Schoolजिल्हा परिषदमुक्ताई वार्तामुक्ताईनगरशाळा
Previous Post

मंडळे निहाय शिबीर घेण्यात यावे – आ.चंद्रकांत पाटील 

Next Post

शिवसेना रावेर तालुका कार्यकारणी जाहीर; पहा कोणाची नियुक्ती झाली ? 

Admin

Admin

Next Post
शिवसेना रावेर तालुका कार्यकारणी जाहीर; पहा कोणाची नियुक्ती झाली ? 

शिवसेना रावेर तालुका कार्यकारणी जाहीर; पहा कोणाची नियुक्ती झाली ? 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group