अमिताभ बच्चन यांचे रिट्विट, आदिशक्ति मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त केले अभिवादन
मुक्ताईनगर : आदिशक्ति मुक्ताबाई यांचा सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वे) वर्ष अंतर्धान सोहळा आज दि.२५ मे रोजी वैद्याख वद्य दशमी मुहूर्तावर असल्याने संत नगरी कोथळी मुक्ताईनगर येथे पंढरीश परमात्मा, रुख्मिणी माता, नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ , संत सोपान काका व लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत असून याच अनुषंगाने प्रत्येक मुक्ताईनगर नागरिक, युवक, महीला भगिनी यांचे व्हॉटस् अप , फेसबुक , इंस्टा , ट्विटर अशा सोशल साईट वर पोष्ट असेल किंवा स्टेटस असेल आज मुक्ताई अंतर्धान सोहळा सर्वत्र व्हायरल झालेला आहे. अशीच एक संत मुक्ताई अंतर्धान सोहळा अभिवादनाची पोष्ट मुक्ताईनगर येथील युवक गणेश लाहोटी यांनी ट्विटर अकाऊंट वर ट्विट केलेली.
अमिताभ बच्चन यांनी केली रिट्विट :
गणेश लाहोटी यांनी ट्विटर अकाऊंट वर ट्विट केलेली पोष्ट बॉलीवूडचे महानायक , सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अकाऊंट वर रिट्विट करून आदिशक्ति मुक्ताई साहेब यांना अभिवादन केले असून तमाम वारकरी व भाविकांना या सोहळ्याच्या शूभेच्छा दिल्या आहेत.