अखेर प्रतीक्षा संपली, मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजनेची मोठी अपडेट आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर शहर व बोदवड शहर हे गेल्या 30 वर्षापासून पूर्णा नदी पात्र अगदी हाकेच्या अंतरावर असलल्यावरही नदी पात्र उशाला आणि कोरड मात्र घशाला अशी गंभीर परिस्थितीने पिण्याच्या पाण्याचे समस्येने त्रस्त होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता व पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुक्ताईनगर शहर व बोदवड शहरासाठी अमृत 2 मधून पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रस्तावित होते. यापैकी मुक्ताईनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथात आले असून काही तांत्रिक अडचणी व महत्त्वपूर्ण बाबी या योजनेत न घेतल्यामुळे केवळ 32 कोटीची योजना करून तत्कालीन एजन्सीने ही योजना पुन्हा अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या योजनेत फ्री सेटिग टॅंक व इतर तांत्रिक बाबींचा समावेश करून ती योजना मोठ्या स्वरूपात करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता आता या पाठपुराव्याला यश आले असून मुक्ताईनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी वाढीव स्वरूपातील पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत.

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर शहराच्या पाणीपुरवठा योजने सोबतच बोदवड शहराच्या ही पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे सांगितले पहा ते मुक्ताई वार्ता सोबत बोलताना काय म्हणाले ?
युट्यूब वरील व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा Click Here
फेसबुक पेज वरील व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा Click Here