‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ यशस्वी होण्यासाठी जळगावच्या प्रभू श्रीरामाला साकडे !
जळगाव – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ मैदान येथे २५ डिसेंबरला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडावी यासाठी जुने जळगावातील प्रभू श्रीरामाच्या चरणी श्रीफळ वाढवून साकडे घालण्यात आले. या वेळी, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, स्थानिक व्यावसायिक श्री गजानन तांबट, श्री. आशिष गांगवे, श्री. रवी कांबळी, श्री. भूषण पाटील, श्री. प्रणव नगणे, श्री. उदय पाटील यांच्यासह हिंदुधर्मप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे सर्वसमावेशक असे ” हिंदवी स्वराज्य ” स्थापन केले होते; त्याचप्रमाणेच “अखंड हिंदु राष्ट्राची” पायाभरणी या ” हिंदु राष्ट्र जागृती” सभेच्या माध्यमातून होणार आहे. भारत देश हा हिंदुबहुल देश असूनही आज येथील महिला सुरक्षित नाहीत. हिंदु मंदिरांचे सरकारीकरण, आंतकवाद, लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यांसारखे प्रकार सर्रासपणे होत आहेत. यासाठी हिंदुराष्ट्राची आवश्यकता आहे. सभेच्या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याने सभेची उत्सुकता लागलेली आहे. सभा भव्य – दिव्य होण्याकडे कल दिसत आहे. जळगाव शहरातील महाबळ कॉलनी, गणेश कॉलनी, कांचन नगर, जोशी पेठ, चंदू अण्णा नगर,पिंप्राळा या भागांसह पाळधी, शिरसोली, नाचनखेडे, नशिराबाद, तरसोद, असोदा, भादली, नांद्रा, कानळदा, मुक्ताईनगर, चोपडा, धरणगावसह जिल्हाभरात युवकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.