“स्वराज्य स्वाभिमानी” जिजाऊ रथ यात्रा संत मुक्ताईनगर येथे दाखल ;
आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत !
संत मुक्ताईनगर: इंदोर येथे राजमाता जिजाऊ पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त दिनांक 12 जानेवारी ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा (महाराष्ट्र) ते इंदोर (मध्य प्रदेश) अशा भव्य पद यात्रेचे “जिजाऊ रथ यात्रा” या माध्यमातून निघालेली आहे ही रथयात्रा आज दिनांक 18 जानेवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्यात आगमन झाले रंथम चिखली घोडसगाव तसेच पिपरी अकरावी येथे महामार्गावर गावकऱ्यांनी जिजाऊ रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत केले तर दुपारी दोन वाजता मुक्ताईनगर येथे नवीन मुक्ताई मंदिरावर संत संमेलनासाठी मुक्कामी थांबलेल्या रथयात्रेचे मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले तेथे जिजाऊंच्या प्रतिमेला मला अर्पण करून अभिवादन केले आणि राजमाता जिजाऊ विचार आणि संस्कार मध्य प्रदेशात जात असून देशभर हेच संस्कार आणि विचार शिवचरित्र पोहोचावे अशी अशा व्यक्त करून त्यांनी रथयात्रेतील आयोजक व सहभागी नागरिकांना शुभेच्छा दिल्या
प्रसंगी मुक्ताईनगर तालुका मराठा समाज अध्यक्ष अनंतराव देशमुख मराठा सेवा संघ राष्ट्रीय वस्तीगृह पक्षाचे सचिव दिनेश कदम बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील नगरसेवक संतोष मराठे, मराठी भाषा संघ अध्यक्ष तसेच जिजाऊ रथ यात्रेच्या आयोजक स्वाती युवराज काशीद,मनीष चौरद (काशीद),अजय काशीद, प्रमोद चिलगर,आशा पाटील,विशाल कनेरकर,रोहित गाडेकर, सुनील महाजन (राष्ट्रीय अध्यक्ष मराठा वस्तीग्रह कक्ष), प्रमोद महाजन (राष्ट्रीय अध्यक्ष मराठा दत्तक कक्ष) गणेश महाजन (राष्ट्रीय अध्यक्ष मराठा कृषी परिषद), हकीम चौधरी (मुस्लिम मन्यार बिर्याणी जिल्हा उपाध्यक्ष) कैलास वंजारी (जिल्हाध्यक्ष वंजारी समाज मराठा सेवा संघ ), संजय पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य बोदवड )अमरदीप पाटील (सामाजिक कार्यकर्ते) अक्षय प्रमोद चौधरी आदींची उपस्थिती होती.
*********************************
दि.१९ रोजी गुरुवारी सकाळी ७ वाजता प्रवर्तन चौकात जिजाऊ रथ यात्रेचे आगमन होणार असून या रथ यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. तरी या रथ यात्रेच्या स्वागता साठी जास्तीत जास्त शिव प्रेमी समाज बांधव , विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून ,सकाळी स्वागत कार्यक्रम आटोपल्यावर ही रथ यात्रा बुऱ्हाणपूर मार्गे मार्गस्थ झाल्यावर खामखेडा येथे रथ यात्रेच्या नाश्ता चहा पाणी कार्यक्रम आटपून रथ यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे.
Like this:
Like Loading...