सारोळा ता.मुक्ताईनगर येथे म.न.रे.गा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ कुटुंबातील सदस्यांना !
रोजगार सेवकांच्या मनमानी कारभाराची लेखी पुराव्यांसह नागरिकांनी केली तक्रार
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील रोजगार सेवकाने स्वतः कुटुंबात घरकुल, विहीर , गोठा , फळबाग लागवड या रोजगार हमी योजनेतील विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभ घेवून घोटाळा केल्याची तक्रार सारोळा येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी,पंचायत समिती मुक्ताईनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद जळगाव यांचेकडे केली असून याबाबत चे मस्टर वरील ऑनलाईन नोंद असलेले पुरावेच सादर केल्याने खळबळ उडाली असून पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
यांनी दिली लेखी तक्रार :
१) रमेश दिनकर सावळे,२) कैलास नामदेव वाघ, ३)विकी प्रभाकर चौधरी,४)ज्ञानेश्वर वसंत जगताप, ५)महेंद्र रमेश गवळी, ६)अनिल रामराव काटे, ७)भास्कर राजाराम गवळी, ८)कैलास पुंडलिक जगताप, ९)रामसिंग उत्तम गोपाळ, ९) संजय राघोजी कोळी, १०)अशोक नामदेव पाटील, ११)विक्रम पांडुरंग गवळी, १२)देविदास जगन्नाथ कोळी, १२)रतन भिलाजी कोळी सर्व रा. सारोळा ता. मुक्ताईनगर यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की मौजे सारोळा येथील रोजगार सेवकाने घरकुल विहीर गोठा फळबाग लागवड योजना या रोजगार हमी अंतर्गत येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पात्र लाभार्थी नागरिकांना डावलून त्यांच्या हक्काच्या शासनाद्वारे जाहीर झालेल्या योजनांमध्ये डावलून स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना योजनेसाठी पात्र नसताना लाभ दिला असून मस्टरवर सादर झालेल्या नमूद नावानिशी अदा केलेल्या बिलांच्या ऑनलाईन नोंदी तक्रारी सोबत जोडल्या असून रोजगार सेवकाने शासनाच्या नियमांची पायमल्ली करून महा घोटाळा केल्याची तक्रार केली असून याबाबत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे आता या प्रकरणात चौकशी अंती काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.