सावदा पाणीपुरवठा योजना 18.06 कोटी निधिसह मंजूर ; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !
मुंबई : अमृत 2.0 अभियान सावदा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा (18.06 कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कम) या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक अमृत -2023/प्र. क्र.98/नवि -33 मुंबई दि.13.03.2023 अन्वये परिपत्रक जाहीर झालेले असून यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. त्यांनी मुक्ताईनगर सावदा बोदवड या मतदारसंघातील तीनही नगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी जनतेला शब्द दिलेला होता,आणि सुरुवातीपासूनच राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे तसेच मागील काळात या संदर्भात मंत्रालयात आढावा बैठक देखील पार पडलेले होती.त्यामुळे या सर्व प्रयत्नांना यश आलेले असून गेल्या आठवड्यात दिनांक 3 मार्च 2023 रोजी मुक्ताईनगर ची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असून आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी सावदा येथील पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे.तसेच येत्या पंधरा दिवसात बोदवड पाणीपुरवठा योजना ही मंजूर होणार आहे अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली.
मुक्ताईनगर मतदार संघातील 35 वर्षांपासून रखडेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील हे जीवापाड प्रयत्न करीत असून अगदी पायाला भिंगरी लावून पाठपुरावा करित आहे. त्यामुळे मतदार संघातील MIDC , मुक्ताईनगर येथील व्यापारी संकुल तसेच केळी उत्पादक शेतकरी बांधवांना केळी माल वाहतूक सोयीची व्हावी यासाठी सुलवाडी ते मुढोळदे पुल तसेच नुकतीच मुक्ताईनगर शहराची पाणीपुरवठा योजना व आता सावादा येथील पाणीपुरवठा योजना अशी मोठ मोठी प्रकल्प मंजूर करून आणलेले आहे. तसेच आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे फडणविस सरकार मधील सत्ताधारी आमदार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी करोडो रुपये रस्ते व इतर विकास कामांसाठी मतदार संघात खेचून आणलेले आहेत व अजूनही जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी देत श्रेयवाद करणाऱ्या काही विरोधी समर्थकांना सूचक इशारा दिला की सद्या सरकार शिवसेना भाजप आहे त्यामुळे कुठे श्रेयवाद करायचा याचेही भान ठेवा अन्यथा तुमचा व तुमच्या नेत्याचा हशा झाल्याशिवाय राहणार नाही अशी कोपरखळी देखील त्यांनी मार्मिक शब्दात लगावली.

फोटो कॅप्शन: मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजनेचा शासन निर्णय आ चंद्रकांत पाटील यांना देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालक मंत्री गुलाबराव पाटील , आ.बांगर