संत मुक्ताई यात्रोत्सव पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी संत मुक्ताई नवीन मंदिर परिसराची केली पाहणी !
पिण्याच्या पाण्याची टाकी, पेव्हर ब्लॉक,मुरुम तसेच डांबरीकरण तातडीने करण्याच्या केल्या सूचना !
संत मुक्ताईनगर : संत मुक्ताई यात्रोत्सव पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी संत मुक्ताई नवीन मंदिर परिसराची पाहणी करून येथे पिण्याच्या पाण्याची टाकी, पेव्हर ब्लॉक,मुरुम तसेच डांबरीकरण तातडीने करण्याच्या सूचना केल्या.

संत मुक्ताई यात्रोत्सव पार्श्वभूमीवर शेकडो पायी दिंडी सोहळे व हजारो भाविक वारकरी नवीन मुक्ताई मंदिर परिसरात फडावर मुक्कामी असतात त्यामुळे येथे त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , खडकाळ परिसरात मुरुम टाकून व्यवस्था होणे यासंदर्भात भाविकांच्या सोयीसाठी नियोजन व्हावे अशी मागणी संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांनी करताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच नवीन मंदिरावर जावून परिसराची पाहणी केली. येथे तात्काळ २ लक्ष रू. निधीची पिण्याची पाण्याची टाकी , परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे व आवश्यक त्या ठिकाणी मुरुम फिलिंग करून डांबरीकरण करणे अशी कामे तातडीने करण्याचे आश्वासन दिले आणि भ्रमणध्वनी वरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
“राजा बोले दळ हाले, या उक्तीप्रमाणे सोमवारी लागलीच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना प्रत्यक्ष पाहणी करून कामाची लागलीच सुरुवात करून संत मुक्ताई यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना येथे कुठलीही अडचण होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही याबद्दल काळजी घेतली जाईल अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.”
यावेळी संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष भैय्यासाहेब ॲड. रविंद्र पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, ईश्वर रहाणे, दिलीप पाटील सर, ललित बाविस्कर, ज्ञानेश्वर हरणे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदींची उपस्थिती होती.