संत मुक्ताई पालखीच्या स्वागतासाठी फडकला सर्वांत मोठा व उंच “भगवा ध्वज”
मुक्ताईनगर : आदिशक्ति संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगर ते पंढरपुर असा १४०० किमी चा प्रवास करून स्वगृही तिर्थक्षेत्री मुक्ताईनगर येथे आगमन झाले. संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताई या वारकरी संप्रदायात अधिकारी दर्जाच्या संत असल्याने त्यांचा पालखी सोहळ्याला महाराष्ट्रात मानाचे स्थान आहे भाविकांत त्यांच्याप्रती मोठी श्रद्धा आहेच मात्र आईसाहेब मुक्ताई ह्या मुक्ताईनगर तालुक्याचे ग्रामदैवत सुद्धा असल्याने त्यांचा पालखी सोहळा स्वगृही आल्याने साक्षात मुक्ताई च आल्याचा भाव ठेवून अख्खे मुक्ताईनगर तालुका वासीय आईसाहेबांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते ठीक ठिकाणी फराळ, नाश्ता , चहा, दूध, थंडपेय आदींची व्यवस्था केली होती तर बॅनर, कमांनी, होर्डिंग्ज, भगवे ध्वज , केळी चे खांब , रांगोळ्या, सडा समार्जन करून स्वागतासाठी मुक्ताईनगर अक्षरशः सजले होते. परंतु एका अनोख्या पद्धतीने केलेल्या तरुणाईच्या प्रयत्नाने मात्र मुक्ताईनगर वासियांचे तसेच वारकरी भाविकांचे लक्ष वेधले होते.
फडकला प्रथमच सर्वात उंच व लांब पल्ल्याच्या ध्वज :
आईसाहेब संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे स्वगृही आगमन होणार असल्याने स्वागतासाठी अख्खे मुक्ताईनगर सजावट सुरू होती. श्रीराम सेना व बजरंग दल व हिंदुत्व वादी कार्यकर्त्यांनी सर्वात मोठा 30 X 55 फुटाचा भगवा ध्वज मलकापूर येथील टेलर कडून शिवून आणला. या ध्वजा साठी सुमारे ३५० मीटर कापडाचा तागा लागला व खरी कसरत लागली तो बांधण्यासाठी तब्बल ३ ते ४ तासांच्या प्रचंड मेहनती नंतर व क्रेन च्या सहाय्याने हा भगवा ध्वज अखेर डौलाने फडकला व मुक्ताई च्या स्वागता साठी सज्ज झाला. प्रचंड मेहनत लागली भगवा ताठ मानेने उभा राहिल्याने म्हणून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. व अवघ्या काही मिनिटात हाच भगवा सोशल मीडियात फेसबूक व व्हॉटस् अप वर प्रत्येकाच्या स्टेटस जागा घेण्यात यशस्वी झाला. तसेच पालखी सोहळ्यातील भाविक व वारकऱ्यांचे , महिलांचे , आबाल वृद्धांचे तसेच शहरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रवाशांचे आकर्षणाचा विषय ठरला होता हा सर्वात मोठा व उंच भगवा ध्वज !
भगवा ध्वज क्रेन च्या सहाय्याने लावण्यासाठी
सचिन शुरपाटने, विजय पोलाखरे, प्रकाश गोसावी व समस्त मित्र परिवाराने प्रचंड मेहनत घेतली.
