संत मुक्ताई अभंग
पंढरपूर महात्म्यपर
अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ।
ते रूप समर्थ पंढरिय ।। १ ।।
पुंडलिके गोविला भुलोनिया ठेला ।
न बैसे बहिला अद्यापिजो ।। २ ।।
नाना बागडियाचे कीर्तन साबडे ।
तेची तया आकडे प्रेमभरी ।। ३।।
मुक्ताई अवघा झाला परमानंद ।
सुखाचा उद्बोद सुखरूप ॥४॥