संत मुक्ताईनगर येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी तसेच तालुका मराठा समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न
संत मुक्ताईनगर : येथील विश्रामगृहावर मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा तसेच राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने जिजाऊ प्रतिमा पूजन व अभिवादन सोहळा दि.१५ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, मुक्ताईनगर तालुका मराठा समाज अध्यक्ष तथा राजे लखुजीराव जाधव समाज विकास बहुद्देशीय संस्था अध्यक्ष अनंतराव देशमुख , प्रकाश पाटील (उपसरपंच उचंदे), प्रफुल जावरे (घोडसगाव) संजय पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य, मानमोडी), उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव -यु डी पाटील ,सहसचिव- भाऊराव पाटील सर, इजि संदिप बागुल सर, कोषाध्यक्ष वसंतराव पाटील (संचालक) दिनेश कदम, निळकंठ महाजन (नरवेल), साहेबराव पाटील (बोरखेडा), माणिकराव पाटील (महालखेडा), ॲड. निरज पाटील, पंडित पाटील (सुकळी), रघुनाथ पाटील सातोड, कुऱ्हा सरपंच बी.सी महाजन, माणिकराव पाटील (वडोदा) ,ईश्वर रहाणे (हरताळे), साहेबराव पाटील (ढोरमाळ), रविद साहेबराव पाटील (मानेगाव), नगरसेवक संतोष मराठे, दिलीप पाटील सर (शेमळदे), नवनीत पाटील (तालखेडा), भास्कर पाटील (धाबे),भाऊराव पाटील (बेलसवाडी), नरेंद्र गवांडे (चिचखेडा) तसेच किशोर पाटील (महालखेडा), बाळासाहेब पाटील, शैलेश पाटील, योगेश मोळक, भोटा गजानन पाटील (चिखली) ज्ञानेश्वर पाटील (बोरखेडा), जितेंद्र पाटील (पोलीस पाटील), साहेबराव सिंगतकर, पत्रकार छबिलदास पाटील, जितेंद्र पाटील ,पांडुरंग पाटील (उचदे), गोलु मुर्ह (घोडसगाव) ,संतोष देविदास पाटील (शेमळदे) सुनील तुकाराम पाटील (तरोडा), भुजंगराव देशमुख ,कल्पेश चौधरी, सोपान तायडे (हरताळे), गणेश ज्ञानदेव पाटील (धामंणदे) किरण महाजन, राहुल देशमुख, अफसर खान, शकूर जमदार,ललित बाविस्कर, कल्याण पाटिल, प्रफुल पाटील,प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष आनंदराव देशमुख,सूत्रसंचालन डी के पाटील सर चांगदेव यांनी केले यावेळी तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.
***************************
शासकीय विश्रागृहाचे कर्मचारी गुलाब पिंजारी यांना सर्व उपस्थित मराठा समाजाच्या पदाधिकारी व समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
***************************
आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांच्यासह सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व समाज बांधवांना तिळ गुळ देवून आशीर्वाद घेतले तर सर्व समाज शुभेच्छा दिल्या तसेच संरक्षण ताफ्यातील पोलिस बांधवांना देखील तिळ गुळ देवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.