संत निंदेचे संतप्त पडसाद : सुषमा अंधारेंचे प्रतिकात्मक दहन !
बाळासाहेबांची शिवसेना, किर्तनकार वारकरी तसेच हिंदुत्ववादी संघटनाचे मुक्ताईनगरात प्रचंड निदर्शने आंदोलन
मुक्ताईनगर : होहिं उलूक संत निंदा रत। मोह निसा प्रिय ग्यान भानु गत।। या राम चरित मानस दोह्या प्रमाणे अल्प ज्ञानाने म्हणजेच वारकरी संप्रदायातील लिखित वांगमयाचा कुठलाही अभ्यास न करता अडाणी बुद्धीने वारकरी शिरोमणी संत ज्ञानेश्वर माउली यांच्यासह संत परंपरेतील अध्यात्माची खिल्ली उडवून संतांविषयी संताप जनक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना, असंख्य वारकरी यांच्या सहभागाने मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात १५ डिसेंबर २०२२ रोजी गुरुवारी स.११ वाजता प्रचंड आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अंधारे याच्या विरोधात प्रचंड घोषणा देवून सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक तिरडीवर चपला मार मारून अंधारेंचा पुतळा दहन करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख छोटू भोई, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख वारकरी भुषण रवींद्र हरणे महाराज, मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जूनारे महाराज, पंकज महाराज, ह भ प सौ दुर्गा संतोष मराठे महाराज, रतिराम महाराज, मृदुंगमनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या सह विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील,युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख गणेश टोंगे , राजेन्द्र हिवराळे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शिवाजी पाटील(कोळी), नवनीत पाटील, जिवराम कोळी, भागवत महरू कोळी, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे(कोळी), शहर संघटक वसंत भलभले , माजी युवा सेना तालुका प्रमुख सचिन(पिंटू) पाटील , सोशल मिडीया प्रमुख शिवराज पाटील , नगरसेवक संतोष मराठे, पियूष मोरे , निलेश शिरसाट, गोपाळ सोनवणे, ब्रिजलाल मराठे, नरेंद्र गावंडे, गणेश पाटील , पप्पू मराठे, यांच्यासह तसेच महिला आघाडीच्या कल्पना पालवे, शोभा कोळी, सरिता कोळी, सुनीता तळेले, ज्योती मालचे, यशोदा माळी,भावना गायकवाड, सुरेखा माळी,उषा पाटील, मंगला धनगर, विद्या तळेले , राधा तळेले,अलका मराठे, नंदा मराठे, मंगलाबाई मराठे, योगिता मराठे, अनुसया मराठे, संगीता मराठे, मीराबाई मराठे, संगीता खराटे, पुष्पा सोनार, मालुबाई कोळी, सरला धामोडे, सरला माळी , सोनी मराठे, यमुना मराठे आणी इतर असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*****************************
“संत परंपरा आणि आणि वांगमय जगाचे हित राखणारे असून या माध्यमांतून समाजात प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. आणि अशात कुठलाही अभ्यास न करता वक्त्यांनी भान राखून संत परंपरेवर बोलावे असे आवाहन ह भ प रवींद्र महाराज यांनी केले आहे.”