श्री.संत मुक्ताई मंदिरातील सेवेकरी आत्माराम हातोळकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन
आदिशक्ती मुक्ताई मंदिरातील निष्ठावान सेवेकरी म्हणून त्यांची पशक्रोशित ओळख
मुक्ताईनगर : तिर्थक्षेत्र आदिशक्ती श्री.संत मुक्ताई साहेब यांच्या जुने कोथळी येथील मंदिरात १२ वर्षापेक्षा अधिक काळ एक तपा पेक्षा जास्त वेळ आईसाहेबांच्या सेवेत असलेले अत्यंत प्रामाणिक मनमिळावू, कनवाळू स्वभावाचे तसेच हजारो लाखो वारकऱ्यांचे आवडते निष्काम कर्मयोगी ज्यांना “आबा” म्हटले जायचे असे स्व.आत्माराम हातोलकर रा. मुळगाव – हातोळा जिल्हा अकोला यांना आईसाहेबांची पहाटेची काकड आरती व पूजेनंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने यात त्यांचे दुःखद निधन झाले.
दोष हे जातील अनंत जन्मीचे । पाय त्या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्या ॥३॥
न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्द करा ॥४॥
शुध्द करा मन देहातित व्हावे । वस्तुती ओळखावें तुका म्हणे ॥५॥
एक निष्काम व प्रामाणिक वारकरी असा अचानक निघून गेल्याने तमाम वारकरी परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे निधनाच्या वार्तेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, उद्धव महाराज सेवेकरी कर्मचारी फडावरील कीर्तनकार वारकरी भाविकांतर्फे त्यांना भावपूर्ण निरोप देवून अंतेष्टी साठी त्यांचा देह मूळ गावी हातोळा जिल्हा अकोला येथे रवाना करण्यात आला.
उद्या जुने कोथळी मंदिरात होणार श्रद्धांजली कार्यक्रम
उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता जुनी कोथळी येथील श्री संत मुक्ताई आईसाहेबांच्या दरबारात त्यांना संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष, विश्वस्त , फडावरील सर्व किर्तनकार , टाळकरी, मृदंगाचार्य, कथेकरी, वारकरी फडकरी यांचे तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम होणार असून यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज,रामेश्वर तिजारे महराज, विशाल खोले महाराज, नितीन अहिर महाराज, पंकज महाराज, विजय खवले महाराज ,रतिराम महाराज खामखेडा ,आकाश तायडे महाराज ,संदिप महाराज खमणीकर ,राजू महाराज बंभाडाा, दुर्गाताई मराठे महाराज, लखन महाराज आदींनी केले आहे.