श्रीराम पाटील यांची कुऱ्हा ता.मुक्ताईनगर येथे कॉर्नर सभा
रावेर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे प्रचार दौरा व कॉर्नर सभेत नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, मापदाचे अध्यक्ष विनोद तराळ , काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, कुऱ्हा काकोडा येथील सरपंच बी.सी.महाजन, ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष यू.डी.पाटील, दिनेश पाटील, एजाज मलिक, छाया साबळे, प्रवीण कांडेलकर, विलास हिरोळे, विशाल रोटे, राजू जाधव, छगन राठोड, मुबारक तडवी, अशोक माळी, ज्ञानदेव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार मयूर साठे यांनी मानले.












