पोटखराब क्षेत्र लागवडीखालील जमिन आकारणी करण्यासाठी तात्काळ कॅम्प आयोजित करावा – आ. चंद्रकांत पाटील
शेतकऱ्यांना दिलासा; उताऱ्यावर पोट खराब क्षेत्र लागवडी लायक होणार
👉 बैठकीत घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू साठे आरक्षित होणे बाबत महत्वपूर्ण चर्चा
👉 २०१८ शासन निर्णयानुसार २०११ पूर्वीच्या अतिक्रमण भोगवटा धारक नागरिकांच्या जागा मोजणीसाठी निधीची तरतुदीची मागणी
मुक्ताईनगर विधानसमा मतदार संघासह जळगाव जिल्ह्यातील पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणलेल्या जमिनीची उताऱ्यावर अधिकृत आकारणी करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात येऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच
२०१८ शासन निर्णयानुसार २०११ पूर्वीच्या अतिक्रमण भोगवटा धारक नागरिकांच्या जागा मोजणीसाठी निधीची तरतुदीची मागणी केली आणि
घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू साठे आरक्षित होणे बाबत महत्वपूर्ण चर्चा बैठकीत केली.यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन लेखी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , “मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील सर्व वर्ग अ पोट खराब क्षेत्र शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणल्यामुळे आकारणी लावण्याबाबत गाव नमुना नंबर सातबारामधील वर्ग अ पोट खराब क्षेत्र बहुतांशी शेतकऱ्यांनी सुधारणा करून लागवडीखाली आणलेली आहे. याबाबत आज दिनांक २९ ऑगस्टच्या बैठकीत सूचनेद्वारे शासनाने नियमांमध्ये बदल करून पोट खराब क्षेत्र लागवडी लायकमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिलेली आहे.

या अभिसूचनेद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार नियम २०१८ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९६९ चा नियम दोनच्या पोट नियममध्ये पोट खराब क्षेत्र जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडखाली आणता येईल आणि अशाप्रकारे धारकाने जमीन लागवडीखाली आणल्यास त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरता जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील. अशी सुधारणा करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या गाव नमुना सातबारावर असलेली जमीन गाव नमुना नंबर आठच्या उतारावर येणार आहे. यामुळे पीक कर्ज. विमा कर्ज, नैसर्गिक आपत्ती, पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा मोबदला, भूसंपादन मोबदला, खरेदी विक्रीतील मोबदला तसेच शासनाच्या सर्व शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांनी स्वतःहून तहसीलदार किंवा संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज केलेला आहे. त्याच शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरील पोट खराब क्षेत्र कमी करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे किंवा सुरू आहे. मात्र; हा लाभ सरसकट सर्व क्षेत्रात शेतकऱ्यांना होणं गरजेच आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघासह जळगाव जिल्ह्यातील पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणलेल्या जमिनीची आकारणी करण्यासाठी तलाठी , मंडळ अधिकारी आणि तहसीलदार स्तरावर कॅम्प आयोजित करण्यात यावा मुक्ताईनगर मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील सर्व पोट खराब क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणलेल्या जमिनीची आकारणी करून या निर्णयाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा.” अशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी करत यासंदर्भात जिल्हाधिकारी निवेदन दिले आहे.