शिवसेना जिल्हा संघटक पदी गजानन मालपुरे यांची नियुक्ती
मुंबई : शिवसेनेचे मुख पत्र सामना वृत्तपत्रात जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली असून जळगाव येथे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांच्या व सर्व सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा थोर समाजसेवक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले श्री गजानन मालपुरे यांची नियुक्ती शिवसेना जळगाव जिल्हा संघटक पदी करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाल्याचे प्रसिद्धीत म्हटले आहे.
दरम्यान , गजानन मालपुरे यांची नियुक्तीचे वृत झळकताच त्यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.