शिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !
आ. चंद्रकांत पाटलांनी केली अधिकाऱ्यांसह पाहणी ! प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांची देखील हजेरी !!
‘बोदवड तालुक्यातील जागृत हनुमान मंदिर,शिरसाळा या देवस्थानाला तिर्थक्षेत्र ब’ वर्ग दर्जा प्राप्त झालेला असून या मंदिरामध्ये आवश्यक असलेल्या मंदिर व भाविकांच्या दृष्टीने सोयी सुविधा तसेच इतर बाबींची माहिती घेऊन विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी संबंधित आराखडा तयार करणाऱ्या एजंसी चे अभियंते तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी यांना तशा सूचना केल्या.यावेळी संपूर्ण मंदिराची पाहणी करून मंदिराला मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण निर्माण होऊन भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षकता आणता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चा केली.
‘यावेळी महामंडलेश्र्वर श्री.जनार्दनजी महाराज यांचे आगमन झाले असता,त्यांचे सविस्तर चर्चा करून भाविकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा यासंदर्भात त्यांचे ही मार्गदर्शन घेतले.
‘याप्रसंगी दिलीप पाटील,शिवराज पाटील,वसंत भलभले,जागृत हनुमान मंदिर, शिरसाळा ट्रस्ट समिती,बोदवड अध्यक्ष व विश्वस्त यांचेशा तालुक्यातील पदाधिकारी,भाविक भक्त उपस्थित होते.