Wednesday, June 18, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय :  मुख्यमंत्र्यांची शासकिय महापूजा सुरू असताना मुख दर्शन सुरू राहणार !

Admin by Admin
June 24, 2023
in महाराष्ट्र, मुक्ताई वार्ता
0
शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय :  मुख्यमंत्र्यांची शासकिय महापूजा सुरू असताना मुख दर्शन सुरू राहणार !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय :  मुख्यमंत्र्यांची शासकिय महापूजा सुरू असताना मुख दर्शन सुरू राहणार !
पंढरपुर येथे आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी  शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे. शासकीय महापूजेच्या चार ते पाच तासांपूर्वीच दर्शनाची बारी  बंद करण्यात यायची. त्यामुळे वारकऱ्यांसह भाविकांची मोठी गैरसोय व्हायची. कारण रांगेतला कालावधी चार ते पाच तासांनी वाढायचा यामुळे वारकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा सुंदर निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू राहणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री बैठकीत ही माहिती दिली आषाढी एकादशीला  मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात होत असतो. यावेळी आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने पर्वणी काळात  जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार  आहे.
पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन देण्याचा  ऐतिहासिक निर्णय
आषाढी एकादशी हा सोहळ्यातील पर्वणीच दिवस असतो. यादिवशी दर्शन मिळावे यासाठी 30-30 तास भाविक दर्शन रांगेत उभारलेले असतात. त्याचवेळी राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनापासून मुकावे लागते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारने एक धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन देण्याचा  निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पूजेनंतर कुणालाही VIP दर्शन नाही, पासवर मर्यादा 
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन आषाढी पर्वणी काळात घेता येणार आहे.
तथाकथित राजकारण्यांची होणारं कोंडी:
राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत करून आनंद व्यक्त केला जात आहे. आषाढी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशी दिवशी दर्शन देण्यासाठी झालेला हा निर्णय यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिस प्रशासनाच्या ताब्यात दिली जाणार असल्याने श्री विट्ठल रुख्मिणी मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही हे विशेष.
Previous Post

शुक्रवारी दि.२३ जून रोजी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा  सोलापूर जिल्ह्यात प्रवेश जिल्हा प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी

Next Post

खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय

Admin

Admin

Next Post
खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय

खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group