‘व्हॉईस ऑफ इंडिया’ ही पत्रकारांसाठी काम करणारी चळवळ कौतुकास्पद : अजित पवार
पवार यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या संमेलन लोगोचे अनावरण
आदितीताई तटकरे, हसन मुश्रीफ, खा.सुनील तटकरे यांचीही उपस्थिती
रायगड (प्रतिनिधी):- पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ने देशभर उभा केलेला लढा हा निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यामध्ये पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ने उचललेले अनेक पाऊल महत्त्वाचे आहे. असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. येथे आयोजित एका कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या कोकणस्तरीय होणाऱ्या पत्रकारांच्या संमेलनाच्या लोगोचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी अजित पवार बोलत होते.
व्हॉईस ऑफ मिडीया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा कोकणस्तरीय पत्रकारांचे संमेलन खालापूर तालुक्यातील कोकण मैरेज हॉल, अंजरूण येथे शनिवार १५ जुलैला आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनला कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, नवी मुंबई व मुंबई परिसरातील शेकडो पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाची जोरदार तयारी कोकण मधल्या पदाधिकाऱ्याने केली आहे या संमेलनाचे औचित्य साधून आज संमेलनाच्या लोगोचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे नेते खासदार सुनील तटकरे, राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे, राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण ‘व्हॉईस ऑफ मिडीया’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी,संघटक खलील सुर्वे, सनी मानकर, आकाश हिवराळे,शेखर पिंगळे, अंकीत साखरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष रणजित मेटके आदींची या समारोपाला उपस्थित होते. या समारोपदरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत पत्रकारांची चळवळ बुलंद करण्यासाठी आवाहनही केले.