मुक्ताईनगर- तालुक्यातील उचंदा 20 रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले वीज पडून त्यात शत्रूघ्न काशिनाथ नमायते धनगर हा शेतमजुर जागीच ठार झाला होता. एका शेत मजूर कुटुंबावर आलेल्या आघाताची आ. चंद्रकांत पाटील यांनी लागलीच दखल घेवून जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केल्याने मयताच्या वारसांना अवघ्या २४ तासाच्या आत मदत जाहीर झाली असून करून मयताचे वारस पत्नी सुषमा नमायते, मुलगा भावेश ,मुलगी वेदिका यांना आज आ. चंद्रकांत पाटील व तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते ४ लक्ष रुपये धनादेश देऊन शासकीय मदत देण्यात आली. नैसर्गिक आपत्ती निधितुन ही मदत देण्यात आली. यावेळी कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती नायब तहसीलदार निशिकांत वाडे,तलाठी ठाकुर, पोलीस पाटील जितेंद्र पाटील,अनंतराव देशमुख, दिलीप पाटील सर, लोकनियुक्त सरपंच शशिकला पाटील, शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई,पंकज पांडव, शेषराव पाटील,ज्ञानेश्वर धनगर, पंडीत धनगर, संजय पाटील, शिवसेना शाखा प्रमुख संदीप पाटील, विजय पाटील, योगेश पाटिल, राहुल धनगर,आदि उपस्थित होते.