मोठी बातमी :
आमदार चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश,
बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेस ९५.१४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली

नगरोत्थान महाभियानांतर्गत बोदवड शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक नगरो-२०२४/प्र.क्र.४३५/नवि-३३ मंत्रालय, मुंबई- ४०००३२. दिनांक:- ०५ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या प्रसिद्ध परीपत्रकानुसार सुमारे ९५.१४ कोटीच्या निधिसह प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मोठा निर्णय झाला असून अवघ्या महिनाभरापुर्वी सदरील योजनेला मंजुरी मिळाली होती यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजितदादा पवार तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे सतत पाठपुरावा केल्याने सदरील योजनेला ९५.१४ कोटी रुपयांच्या निधीसह राज्याच्या नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली. तर लगेचच निविदा प्रक्रिया होऊन महिना भरानंतर कामास सुरुवात सुरुवात होणार आहे अशी माहिती आमदारांचे स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून बोदवड वासियांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत असल्याने बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे ड्रीम प्रोजेक्ट हाती घेवून आमदार चंद्रकांत पाटील यांचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. तर जनतेला दिलेल्या आश्वासनाचे आज फलित झाल्याने आ.चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात वचन पूर्ती केल्याने बोदवड वासियांतर्फे आभार व्यक्त केले जात असून लोकप्रतिनिधी कसा असावा तर आ.चंद्रकांत पाटील यांच्यासारखा असावा यासह अभिनंदन व आभार सोशल मीडियातून व्यक्त करताना नागरिक दिसून येत आहे.

