मुक्ताई वर श्रद्धा, भाव ठेवून सेवा करा, फल प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही – ह.भ.प.माधवदास महाराज राठी
मुक्ताईनगर : श्री.संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबेकेश्वर जि. नाशिक चे विश्वस्थ ह.भ.प.माधवदास महाराज राठी यांची चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा शनिवारी दि.३१ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. मुक्ताईनगर येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई देवस्थान येथे श्री सद्गुरू धुंडा महाराज देगलूकर सेवा समिती,पंढरपूर व श्री संत मुक्ताई संस्थान ,मुक्ताईनगर समाधीस्थळ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – निरूपण व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये ही चतुर्थ दिवसाची किर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली.
“मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ ।सर्वत्री वरिष्ठ आदिशक्ती ।।
जगाच्या उद्धारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढजन /।।
अज्ञानासी बोध सज्ञानासी शुद्धी ।तोडिली उपाधी सर्वत्रांची ।।
लडिवाळ तान्हे एका जनार्दने ।कृपा असो देणे मजवरी ।।”
जगाच्या उद्धारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढजन /।।
अज्ञानासी बोध सज्ञानासी शुद्धी ।तोडिली उपाधी सर्वत्रांची ।।
लडिवाळ तान्हे एका जनार्दने ।कृपा असो देणे मजवरी ।।”
या आदिशक्ति श्री संत मुक्ताई च्या महतीची यशो गाथा दर्शविणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या सुंदर अभंगावर अभ्यास पूर्ण चिंतन मांडतांना त्यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून वाक पुष्पाद्वारे अनेक दाखले व दृष्टांतांच्या माध्यमांतून अभंगाच्या प्रत्येक चरणांची उकल केली. प्रत्येकाने आपल्या समाधीचा प्रस्ताव भगवान पांडुरंग व सद्गुरु कडून मान्य करून घेतला कुठेही कसलीही कल्पना आईसाहेब मुक्ताबाईंनी आपली अवतार लिहिला व्यापक करून टाकली काय वेगळं स्वरूप असेल ही आदिमाया योग माया मुक्ताई नामदेव महाराज वर्णन करतात देवाची बोलताना ,
नामा म्हणे देवा ,बोलोनिया काही |
नलगे मुक्ताबाई , गुह्य तुझे ||
समाधी प्रकरणाचा शेवट करताना गेले दिगंबरा विभूती राहिल्या त्या किमती जगा माझी हे वर्णन करताना आईसाहेबांच्या बाबतीत नामदेव महाराज आणि देव दोघेही निवृत्त होतात मुक्ताबाईंचं कुणाला कळलं नाही. नाथ महाराजांचे एवढे उपकार आहेत की ज्ञान ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ आणि आईसाहेब मुक्ताई यांच्या बद्दल जेवढे नाथ महाराजांनी अंगणवाडी लिहून ठेवले तेवढेच लिहून ठेवलं नाही त्यांनी निवृत्तीनाथांच्या २३ अभंगातून वर्णन केला आहे. ज्ञानेश्वरीचे प्रत्यक्ष स्वरूप आणि समाधीचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारे नाथ महाराज आहेत हा जर उपकार त्यांनी केला नसता तर आज संस्थांनचेही अस्तित्व दिसलं नसतं आणि ज्ञानेश्वरी ची मूळ आणि शुद्ध स्वरूपातली सेवा सुद्धा मिळाली नसती. जवळ जवळ सहा सात अभंगातून आईसाहेबांचं वर्णन नाथ महाराजांनी केल आहे. या अभंगांमधून वेगवेगळे अभंग उत्तम आहे अगदी तीन अक्षरांचा निवृत्ती हा जप केल्यानंतर काय फल प्राप्ती होते, इथपासून सगळा विचार महाराजांनी सांगितला आहे. त्यापैकी आई साहेबांचे वर्णन सांगणारा जो अभंग आहे त्यातील हा खूप गोड अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून आईसाहेबांचे वर्णन खूप व्यापकतेने त्यांनी केल आहे. जसा भगवंताच्या महतीच्या गुणांचा पार लागत नाही असं वर्णन पुष्पदंत करतात तसं आईसाहेबांच्या वेगवेगळ्या कृपेच्या स्वरूपांचे वर्णन करण्याकरिता शब्द अपुरे पडतात मुक्तांमध्ये सर्वतोपरी मुक्त आणि जवळ येणाऱ्यांमध्ये बद्धालाही मुक्त करण्याचे सामर्थ ज्यांच्यामध्ये आहे त्या आईसाहेब मुक्ताई आहेत आई साहेबांकडे पाहिलं तर बद्ध व्यक्तीला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल असे हे स्वरूप आहे. ज्ञानोबा त्यांच्या गुणांचे वर्णन करताना म्हणतात , “मुक्ता ते निर्धारित लाभे आपलीच मुक्तता |”आईसाहेब मुक्ताईंकडे पाहिलं तर जी भावनिकता अंतकरणात लागते परमार्थाच्या शुद्ध वाटचाली करता अंतकरणात प्रेम निर्झर प्रकट होण्याकरता जी भावनिकता लागते ते आई साहेबांकडे पाहिल्यावर लाभते एकीकडे अनेकांना घडविण्याचे सामर्थ त्यांच्याकडे आहे आणि हे असताना सुद्धा किती अलिप्तपणे त्या आहेत त्यांचे स्वरूप काय वर्णाव की त्या चरणावरची दृष्टीच हटत नाही. आईसाहेब मुक्ताई अशा संत दैवत आहेत की इथल्या भूमीतल्या लोकांना वेगळा परमार्थ करण्याची गरजच नाही केवळ त्यांची अंतकरणपूर्वक सेवा करा आईसाहेब मुक्ताई ची कृपादृष्टी आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
किर्तनाची सांगता झालेनंतर ह. भ. प. माधवदास महाराज राठी यांचा संत मुक्ताबाई संस्थान चे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, चैतन्य महाराज देगलूरकर, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी सत्कार केला. तसेच सकाळचे नाश्ता, अन्नदाते , सायंकाळ चे अन्नदाते यांचाही शाल श्रीफळ व मुक्ताई ची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.वेळी संत मुक्ताईचे विश्वस्त तसेच फडावरील सर्व किर्तनकार, टाळकरी फडकरी तसेच हजारो भाविक व श्रोते उपस्थित होते.