मुक्ताईनगर व सावदा येथे शासकीय गोदाम बांधकामासाठी 4.84 कोटी निधीसह मंजुरी
आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा ठरला यशस्वी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदार संघातील शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे तसेच शासकीय गोदामांची झालेली दुरावस्था पाहता मुक्ताईनगर व सावदा येथे शासकीय गोदाम बांधकाम करण्यात यावे यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांचे कडून प्राप्त नाबार्ड अंतर्गत नवीन शासकीय धान्य गोदाम बांधकाम प्रशासकीय मान्यता देणे संदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी झाले असून महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक गोदाबां-1022/प्र. क्र.160/नापु -16- ब मुंबई दि.30.11.2022 अन्वये 1) मुक्ताईनगर येथे शासकीय गोदाम बांधकाम करणे (अंदाजपत्रकीय रक्कम 2.65 कोटी) , 2) सावदा ता. रावेर येथे शासकीय गोदाम बांधकाम करणे (अंदाजपत्रकीय रक्कम 2.19 कोटी) असे एकूण 4.84 कोटी रु. निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून मतदार संघासाठी भरीव विकास निधी खेचून आणणारा एक कर्तव्याकदक्ष लोकप्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून लागल्याचे बोलले जात आहे.