मुक्ताईनगर येथे सुरू आहे दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ
उद्या ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता होणार श्री दत्त जयंती सोहळा 

मुक्ताईनगर – दिंडोरी, श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक केंद्र जूनेगाव मुक्ताईनगर येथे प्रात:स्मरणीय परम पूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व महिला व पुरुष तसेच तरुण सेवेकरी यांच्या उस्फुर्त सहभागाने दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ, प्रहरी सप्ताहाचे आयोजन दि.१ डिसेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ या पर्वात सुरू आहे.
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र, गुरुपीठ त्र्यंकेश्वर जि.नासिक मार्गदर्शक प्रातः स्मरणीय , परम पूज्य श्री गुरुमाऊली अन्नासाहेब मोरे दादा यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी सप्ताहाला सुरुवात झाली होती. पुर्ण सप्ताह काळात ग्रामदेवता मानसन्मान, मंडळ मांडणी, अग्निस्थापना, मंडळ स्थापना, श्री गुरुचरित्र पारायण, गणेश मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, गिताई याग, रूद्र याग, मल्हारी याग, बली पूर्णाहुती , श्रीमद् भागवत पारायण, श्री नवनाथ पारायण, श्रीपाद पारायण, श्री स्वामी चरित्र पारायण, प्रहरी, नाम जप अशा महत्वपुर्ण सेवा येथे पार पडत असून भक्तीपूर्ण वातावरणात व आनंदात हा सोहळा अतिशय व शिस्तीमध्ये संपन्न होत आहे. यज्ञ सेवा चे यजमान विजय टोंगे यांनी सपत्नीक करित आहे.सर्व सेवेमध्ये असंख्य महिला भगिनी आणि पुरुष बांधव सेवेकरी यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवत आहेत.
सोहळा यशस्वीतेसाठी सेवेकरी परिवार प्रचंड मेहनत घेत आहे.
उद्या ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता होणार श्री दत्त जयंती सोहळा
श्री.स्वामी समर्थ केंद्रात बुधवारी दि.७ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जयंती सप्ताह निमित्त परमपूज्य गुरुमाऊली अन्नासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी सप्ताह काळात श्री गुरुचरित्र पारायण केले.या पारायणाची देखील सांगता जयंती उत्सवात महाआरतीने होणार आहे.
तरी दत्त जयंती उत्सव उद्या ठीक बुधवारी दुपारी ठीक 12 :39 मिनिटांनी महाआरती होईल तत्पूर्वी दु.12 :15 वा. चौथा अध्याय वाचन होईल .तरी भाविक व सेवेकाऱ्यांनी दत्त जयंती उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवेकरी परिवारातर्फे करण्यात आलेले आहे.