मुक्ताईनगर येथे प्रभाग क्र.12 मधील शिवरायनगरातील हनुमान मंदिरासमोर श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास आज मंगळवार पासून प्रारंभ
तपपूर्ती सोहळा : यंदाचे १२ वे वर्ष तपपूर्ती सोहळा असल्याने महंत नितीनदास महाराज अहिर यांचा अमृततुल्य वाणीतून संगीतमय कथा श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
मुक्ताईनगर येथे प्रभाग क्र.12 मधील शिवरायनगरातील हनुमान मंदिरासमोर
श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास आज मंगळवार पासून प्रारंभ
तपपूर्ती सोहळा : यंदाचे १२ वे वर्ष तपपूर्ती सोहळा असल्याने महंत नितीनदास महाराज अहिर यांचा अमृततुल्य वाणीतून संगीतमय कथा श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
मुक्ताईनगर : सद्या मार्गशीर्ष महिन्यात सर्वत्र व्रत वैकल्ये , उपवास व भगवंताच्या नामस्मरणासाठी विशेष असलेला मास असतो .त्यातच आदिशक्ती श्री. संत मुक्ताई साहेबांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या संत भूमी तिर्थक्षेत्रातील पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाचा प्रभाव असल्याने या परिसरात टाळ मृदुन्गाचा गजर सतत होतच असतो . शहरातील अनेक भागात वर्षभरात श्रीमद भागवत कथा संकीर्तन सप्ताह सुरूच असतात. यानुसार दि 13 डिसेंबर पासून येथील प्रभाग क्र 12 मधील शिवरायनगर हनुमान मंदिरासमोर संगीतमय भव्य श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली असून या सप्ताहाची सांगता दि 20 डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. या सप्ताहाचे हे सलग 12 वे वर्ष असून संस्कृती जतनाचा , परंपरेचा, भक्ती भावाचा मुक्ताई साहेबांच्या अखंड कृपेचा तसेच प्रभागातील एकोप्याचा हा तपपूर्ती सोहळा येथे साजरा होत आहे. आज श्री. राजु जोगी, रविंद्र लिहेकर , ज्ञानेश्वर माळी, पवन मराठे, आकाश सोनार आदी पाच जोडप्यांनी सपत्नीक पूजा करून भागवत कथा कलश पूजन स्थापना करण्यात आली.
संगीतमय श्रीमद भागवत कथा वाचक महंत ह भ प श्री.नितीनदास महाराज अहिर यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रोते व भाविकांना कथेचा लाभ मिळणार आहे . तसेच दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत प्रसिद्ध नामांकित किर्तकारांची संगीतमय सुश्राव्य कीर्तनांची शृंखला देखील पार पडणार आहे . त्यानुसार दि 13 डिसेंबर रोज मंगळवारी ह भ प गणेश महाराज महाराज (ज्ञानेश वारकरी शिक्षण संस्था, मोहोड), दि 14 रोज बुधवारी ह भ प सौ भारतीताई कोळी महाराज (कोथळी ता.मुक्ताईनगर), दि 15 रोज गुरुवारी ह भ प श्रीमती मिराताई चौधरी महाराज (सिंगाईत ता. जामनेर) , दि 16 रोज शुक्रवारीह भ प ज्ञानेश्वर महाराज (दिघी), दि 17 रोज शनिवारी ह भ प भिमराव साठे महाराज (शेगांव), दि 18 रोज रविवारी ह भ प दिलीप महाराज (गिरणी बेलाड) , दि 19 रोज सोमवारी ह भ प सुरेंद्रजी धर्माधिकारी महाराज (खामगाव), दि.20 रोजी मंगळवारी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा पार पडल्यानंतर काल्याचे कीर्तन कथावाचक ह भ प नितीनदास महाराज अहिर यांचे होणार असून यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. तसेच सायं. 7 ते 10 वाजेपर्यंत ह भ प मंगेश महाराज (शेवगा चिखली ता.बोदवड यांचा भारदस्त भारुडाचा कार्यक्रम पार पडेल.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
या कार्यक्रमास ह भ प रतिराम महाराज (खामखेडा), ह भ प रमेश महाराज (खामखेडा), ह भ प विनोद महाराज (सातोड), ह भ प काशीनाथ महाराज घटे (सातोड) , ह भ प चेतन मराठे महाराज, ह भ प उमेश महाराज ठोके, ह भ प अंबादास महाराज सरोदे, ह भ प गणेश महाराज , ह भ प दिनेश महाराज (खामखेडा), संतोष पाटील (नामपूर) , समाधान महाराज (बर्डे) यांचेसह महिला हररिपाठ मंडळ, मुक्ताईनगर (प्रभाग क्र 12) यांची साथ लाभणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी प्रभाग क्र 12 मधील रहिवाशी महिला व पुरुष नागरिक आबाल वृद्ध व हनुमान मित्र मंडळ, हनुमान जयंती उत्सव समिती तसेच काकड आरती समिती हे विशेष प्रयत्न करीत आहे.