मुक्ताईनगर येथील जुनेगावातील श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातील श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञा सप्ताह सोहळ्याची गुरुवारी मांदीयाळी ने मोठ्या उत्साहात सांगता !
मुक्ताईनगर : श्री.गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ सेवा सोहळा सांगता कार्यक्रम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात व स्वामी नामाच्या जयजयकारात मुक्ताईनगर शहरातील जुनेगावातील श्री.स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र येथे श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा दि.७ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानंतर आज दि.८ डिसेंबर गुरुवार रोजी श्री दत्त पूजन व मांदीयाळी ने कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.
दरम्यान येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश पुजन, पादुका पूजन, अभिषेक, महाआरती, श्री गुरुचरित्र पारायण सांगता ,महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




