मुक्ताईनगर नगरपंचायतीचे लेखापालांचे अखर्चित निधीचे व्यवस्थापनाने 94 लाखांचा नफा, आमदारांनी केला सत्कार !
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कार्यालयीन विविध योजनांचे अखर्चित निधीचे बँक करंट खात्यातील रकमांचे लेखापाल श्रीपाद मोरेश्वर यांनी योग्य व्यवस्थापन करून तसेच फिक्स डीपॉझिट करून विविध रकमांवर मिळविलेल्या निव्वळ व्याजापोटी 94 लाख रुपयांचा घसघशीत नफा मिळवून दिला. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अशा कर्तव्यदक्ष लेखापाल श्रीपाद मोरेश्वर यांचा थेट नगरपंचायत कार्यालयात जावून शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
प्रसंगी गटनेता पियूष मोरे, निलेश शिरसाट ,नगरसेवक संतोष मराठे, मुकेशचंद्र वानखेडे, संतोष (बबलू)कोळी , ललित महाजन, वसंत भलभले, आरिफ आझाद, युनूस खान, गोपाळ सोनवणे , संजय कांडेलकर आदींची उपस्थिती होती.