मुक्ताईनगर तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटातून शरद बोदडे प्रथम
मुक्ताईनगर — शहरातील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे तालुका मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. त्यात माध्यमिक शिक्षक गटातून शरद बोदडे प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.तसेच शरद बोदडे हे देशदूत पत्रकार असून संत मुक्ताई पत्रकार बहुद्देशीय संस्था,मुक्ताईनगर चे अध्यक्ष आहेत.
मुक्ताईनगर तालुका विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून सहावी ते आठवी मधून 80 उपकरणे तर नववी ते बारावी मधून 42 उपकरणे तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षक गटातून १२ उपकरणे सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन गट विकास अधिकारी हेमंत काथेपुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
# सहावी ते आठवी गटातून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी पारस प्रफुल मुंगे , कौस्तुभ संजय वाडीले , हितेश घाटे यांचा स्मार्ट हेल्मेट या उपकरणासाठी प्रथम क्रमांक , शिवाजी हायस्कूल कुऱ्हा येथील विद्यार्थी प्रेम निनाजी गरड याला होम क्लिनर उपकरणाला द्वितीय तर स्वर्गीय निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगरचा विद्यार्थी जयेश स्वप्नील खोले याच्या वाटर लेव्हल इंडिकेशनला तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. तर उत्तेजनार्थ बक्षीस एस बी चौधरी स्कूल चांगदेवचा विद्यार्थी वरद घनश्याम चौधरी याला ऑरगॅनिक फार्मिंग तसेच स्वर्गीय अशोक फडके स्कूल कुऱ्हाची विद्यार्थिनी कु.कोमल गणेश उगले यांना देण्यात आले.
————————————————————–
# नववी ते बारावीच्या गटातून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी अनुराधा प्रदीप वाघमारे हिला सेल वुमन प्रोटेक्शन या उपकरणासाठी प्रथम क्रमांक, माध्यमिक विद्यालय पिंपरीनांदू येथील विद्यार्थी दीपक कांतीलाल जयस्वाल याला शेतकऱ्यांच्या समस्या या उपकरणासाठी द्वितीय क्रमांक तर स्वर्गीय निखिलभाऊ खडसे स्कूल मुक्ताईनगरचा विद्यार्थी चिन्मय अविनाश फेगडे याला पी.व्ही.सी.गण या उपकरणाला तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ म्हणून मयुरी आनंदा पाटील लोकेश महेंद्र घोडके यांच्या उपकरणाला देण्यात आले.
# शिक्षकांच्या माध्यमिक गटातून शरद बोदडे प्रथम तर प्राथमिक गटातून शिवाजी भोंडेकर प्रथम —
प्राथमिक शिक्षक गटातून जिल्हा परिषद शाळा माळेगाव येथील शिक्षक शिवाजी भिका भोंडेकर ( प्रथम क्रमांक) तर माध्यमिक शिक्षक गटातून
गणित प्रतिकृतीसाठी नवीन माध्यमिक विद्यालय सुकळीचे शिक्षक शरद मधुकर बोदडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाप्रसंगी विस्तार अधिकारी राजू तडवी, तालुका समन्वयक महिंद्र मालवेकर ,विज्ञान मंडळाचे तालुकाप्रमुख सी.डी.पाटील, गणिताचे तज्ञ डॉ.पी.एस.कोळी , सर्व विज्ञान अध्यापक मंडळ, केंद्रप्रमुख, विषय तज्ञ , विषय शिक्षक व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पवार , जे.ई.स्कूल प्राचार्य आर.पी.पाटील,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सरला पाटील , प्रदीप दाणे, मुख्याध्यापक नितीन काटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.