मुंबई येथे मराठा भवन जागेसह निधीची तरतूद व्हावी तसेच मतदार संघातील नागरी व ग्रामीण विकास कामांना मंजुरी व निधी प्राप्त व्हावा !
आमदार चंद्रकांत पाटील यांची लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !!
मुंबई | मुक्ताईनगर : महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाची लोकसंख्या ही करोडोच्या घरात आहे. राज्याची राजधानी मुंबई येथे दररोज राज्यभरातून मराठा समाजातील हजारो नागरिक आरोग्य, शैक्षणिक, महसूल , प्रशासकिय व मंत्रालयीन कामकाजानिमित्त मुंबई येथे ये जा करावी लागते. त्यातच मुंबई येथे राहण्याची व मुक्कामाची सुविधा नसल्याने नागरिकांना दररोज लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.त्यामुळे नागरिकांतर्फे मुंबई येथे मराठा भवन बांधण्यात यावे अशी गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी आहे या मागणीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे मुंबई येथे मराठा भवन साठी जागा व निधीची तरतूद करावी तसेच मुक्ताईनगर नगर मतदार संघातील सावदा, बोदवड व मुक्ताईनगर नागरी हद्दीत तसेच ग्रामीण भागात पायाभूत व मूलभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त होणे साठी विविध लेखी पत्राद्वारे मागण्या केल्या. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव मागणीच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत.
यावेळी उपसभापती नरहरी झिरवाळ , माजी मंत्री दादा भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय कुटे आदींची उपस्थिती होती.