Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मंडळे निहाय शिबीर घेण्यात यावे – आ.चंद्रकांत पाटील 

Admin by Admin
July 4, 2024
in मुक्ताई वार्ता
0
मंडळे निहाय शिबीर घेण्यात यावे – आ.चंद्रकांत पाटील 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंडळे निहाय शिबीर घेण्यात यावे – आ.चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंडळ निहाय शिबिरे घेण्यात यावी – आमदार चंद्रकांत पाटील

राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा १५००  रुपये अनुदान लाभ देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा केलेली असून त्या घोषणेची अंमलबजावणी तातडीने होण्यासाठी सरकारचा मानस असून मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर बोदवड व रावेर तालुक्यातील मंडळे निहाय शिबिरे घेऊन ही योजना व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक असल्याने,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मतदार संघातील प्रत्येक तालुक्या ठिकाणी मंडळ निहाय शिबिरे घेऊन व्यापक स्वरूपात राबविणे संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर ,बोदवड व रावेर तहसिलदारांना लेखी पत्राद्वारे सूचित केलेले आहे.
त्यामुळे योजनेसाठी पात्र लाभार्थी महिला भगिनी या योजनेपासून कोणत्याही कारणास्तव वंचित राहू नये यासाठी काळजी घेतली जाणार असून शिवसेनेसह आमदार चंद्रकांत पाटील यांची कार्यकर्त्यांची फळी देखील ग्राउंड लेव्हलला काम करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान मंडळे निहाय शिबिर घेतल्याने ठिकठिकाणी गर्दी कमी होणार असून महिलांचा त्रागा देखील कमी होणार आहे. तसेच सद्यस्थितीत पावसाळा परिस्थिती असल्याने शेतीच्या कामकाजावर कुठलाही परिणाम होऊ नये तसेच महिलांना या योजनेत अर्ज सादर करताना कुठल्याही अडचणींचा सामना होऊ नये यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात असून अनेक अटी व शर्ती देखील या योजनेतून सरकारने कमी केलेल्या दिसून येत आहेत त्याच धर्तीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंडळे निहाय शिबिरे घेऊन गाव खेड्यातून भाडे खर्चून महिलांना शहरा ठिकाणी येण्याची गरज पडू नये म्हणून मतदार संघातील मुक्ताईनगर ,बोदवड व रावेर तालुक्यातील महसुली मंडळे निहाय हि शिबिरे घेण्यात यावी अशी त्यांची तिघेही तालुक्यांच्या तहसीलदारांना सूचना आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांके तांक 202407031335114330 असा आहे. हा शासन निर्णय डीजीटल
स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.
Tags: Ajeet dada pavarAjit pavarDeputy CM Devendra FadnavisEknath shindeLatest Marathi NewsMukhyamantri mazi ladaki bahin yojanaMuktai vartaMuktai varta newsमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाशासन
Previous Post

महत्त्वाची घोषणा ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा मोठा दिलासा !

Next Post

अरेच्चा…!  जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, चक्क जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम 

Admin

Admin

Next Post
अरेच्चा…!  जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, चक्क जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम 

अरेच्चा...!  जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, चक्क जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group