संत मुक्ताई अभंग
पंढरपूर महात्म्यपर
मंगळ ते नाम मंगळ ते धाम।
मंगळ पुरुषोत्तम मंगळची ॥१॥
मंगळ ते नाम मंगळ ते धाम।
मंगळ पुरुषोत्तम मंगळची ॥१॥
मंगळ ते तीर्थ मंगळ ते क्षेत्र ।
मंगळ पवित्र नामघोष ॥२॥
मंगळ ते भक्त मंगळ कीर्तनी ।
मंगळ चक्रपाणी गाती नाम ||३||
मंगळ सोहळा वैष्णवाचा हाट।
मंगळ ती पेढ़ पुंडलिक ॥४॥
मंगळ नरनारी ओवाळती हरी। मुक्ताई उभीद्वारी मंगळाच्या ॥ ५॥