भजन आणि नाम चिंतन श्रद्धायुक्त अंतकरणाने करावे – ह. भ. प. भरत महाराज पाटील
मुक्ताईनगर : सदगुरु झेंडुजी महाराज बेळीकर गादिसेवक तसेच मुक्ताई चे निष्ठावंत वारकरी ह. भ. प. भरत महाराज पाटील यांची तृतीय दिवसाची कीर्तन सेवा शुक्रवारी दि.३० डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. मुक्ताईनगर येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई देवस्थान येथे श्री सद्गुरू धुंडा महाराज देगलूकर सेवा समिती,पंढरपूर व श्री संत मुक्ताई संस्थान ,मुक्ताईनगर समाधीस्थळ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – निरूपण व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये ही किर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली.
भजन भावो देही नित्य नाम पैठा।
नामेचि वैकुंठा गणिका गेली ॥
नाममंत्र आम्हा हरिरामकृष्ण ।
दिनिनिशी प्रश्न मुक्तिमार्ग |
नामचि तारकु तरले भवसिंधु ।
हरिनामछंदु मंत्रसार॥
मुक्ताई चिंतनी हरि प्रेम पोटी,
नित्य नाम घोटी अमृत सदा ॥

या आदिशक्ति श्री संत मुक्ताई यांच्या नित्य हरिपाठातील सुंदर अभंगावर अभ्यास पूर्ण चिंतन मांडतांना त्यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून वाक पुष्पाद्वारे अनेक दाखले व दृष्टांतांच्या माध्यमांतून अभंगाच्या प्रत्येक चरणांची उकल केली. नाम चिंतन आणि भजनाने वैकुंठाची प्राप्ती होते नाम चिंतन श्रद्धायुक्त अंतकरणाने करावे असे त्यांनी सांगितले तसेच सद्गुरु धोंडा महाराज यांच्या हरिपाठ विवरण वाचण्याचेही त्यांनी नमूद केले. भजन कीर्तन करताना देवाच्या भजन चिंतनाशिवाय आपल्या जीवनाची सार्थकता नाही हा भाव कायम असावा तेव्हा तुमची भक्ती सार्थकी लागेल तसेच त्यांनी भजन केल्यानंतर वैकुंठ्याची प्राप्ती आहे तर भजन केल्यानंतर नारकाची ही प्राप्ती आहे असे सांगत भजन प्रेमत्त अंतकरणाने व श्रद्धायुक्त अंतकरणाने केलं तर वैकुंठ प्राप्त होईल परंतु मंगळवार भजन फालतू भजन केले तर जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणाप्रमाणे भजन ते मंगळवारी लाडका जाणे चुकेना म्हणून भजन करणारा ने कधीही या अविर्भावात राहू नये की ते भजन करून संप्रदायावर उपकार करत आहे कारण भजन अशी एक साधना आहे की तुकाराम महाराज म्हणतात “तुका म्हणे येथे प्रमाण, काय थोरपण जाळावे ते” म्हणजे असे भावना युक्त शुद्ध अंतकरणाने भजन करणे नित्य नामस्मरण प्रेमकत अंतकरणाने करणे हीच नद्यांची निष्ठा आणि प्रतिष्ठा आहे आणि यालाच वैकुंठाची प्राप्ती आहे.असे अनेक उदाहरणे व दाखल्यांच्या माध्यमातून अभंगांची पूर्ण उकल करून सांगितले.

किर्तनाची सांगता झालेनंतर ह. भ. प. भरत महाराज पाटील यांचा संत मुक्ताबाई संस्थान चे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, चैतन्य महाराज देगलूरकर, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज सत्कार केला. तसेच सकाळचे नाश्ता, अन्नदाते , सायंकाळ चे अन्नदाते यांचाही शाल श्रीफळ व मुक्ताई ची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.वेळी संत मुक्ताईचे विश्वस्त तसेच फडावरील सर्व किर्तनकार, टाळकरी फडकरी उपस्थित होते.