बोदवड तालुका तेली समजातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार !
मल्टी पर्पज हॉल बांधकामासाठी ५० लक्ष रू. निधी सह मंजूर करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा ठरला यशस्वी
मुक्ताईनगर : बोदवड तालुक्यातील तेली समाजातील विविध सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम, लग्न सोहळे यासाठी बोदवड तालुका ठिकाणी शहरात हक्काची वास्तू असावी अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. याच मागणी संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी तेली समाजातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा केल्याने दि.२५ जुलै २०२२ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात बोदवड येथे संत जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे.(५० लक्ष) मंजूर झाले असून यामुळे तेली समाजातर्फे बोदवड शहरात एकच जल्लोष करण्यात आला होता. तसेच दि.३१ जुलै २०२२ रोजी रविवारी शेकडो तेली समाज बांधवांनी आमदार पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी येवून आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य सत्कार केला . यावेळी हे माझे कर्तव्य आहे असे उद्गार काढीत आ पाटील यांनी भविष्यात सभागृहाचे कामास निधीची कमतरता झाल्यास आणखी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यांनी दिले आहे.
देवेंद्र खेवलकर,डॉ. विशाल चौधरी, संजय फाटे, दिलीप तेली,रमेश चौधरी,अशोक खेवलकर, मयुर डवले,राजू तेली,शाम खेवलकर,अशोक जावरे, प्रकाश खेवलकर, प्रमोद दैवें, राजू जवळकर, मोहन जावरे,रवि जयसिंगपूरे,अर्जुन फंडाटे, अविनाश चौधरी, रामचंद्र चौधरी,प्रमोद तेली,विशाल जावरे, सोनू शिरसोले, दिलीप तुरे, सखाराम खेवलकर, विशाल वारुडे, विकी फाटे,रवि कवसे,गौरव शिरसोले, गोपाल फाटे, अजय फाटे, प्रमोद खेवलकर यांचेसह असंख्य तेली समाज बांधव तसेच मुक्ताईनगर येथील वसंत भलभले, पुरुषोत्तम खेवलकर, पंकज पांडव, राजेंद्र तळेले आदींची देखील उपस्थिती होती.