प्रवचन : वाचावी ज्ञानेश्वरी – ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर
मुक्ताईनगर : तीर्थक्षेत्र श्री संत आदिशक्ती मुक्ताई मंदिर जुनी कोथळी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन अशा सांप्रदायिक वारकरी परंपरेत कलश सप्ताह म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संकीर्तन नाम महोत्सव असा भव्य सोहळा सुरू असून,
वाचावी ज्ञानेश्वरी
डोळा पहावी पंढरी ||१||
ज्ञान होय अज्ञानासी
ऐसा वर त्या टीकेसी ||२||
ज्ञान होय अति मुढा
अति मूर्ख त्या दगडा ||३||
वाचील जो कोणी
जनी त्यासी लोटांगणी ||४||
या अभंगात संत जनाबाई ज्ञानेश्वरीचे महात्म्य सांगतात.त्या म्हणतात, मनुष्याने आयुष्यात एकदातरी ज्ञानेश्वरी वाचवी व पंढरी पहावी.अज्ञानी मनुष्यालाही ज्ञान होइल असा त्या टीकेस वर आहे.एवढेच नव्हे तर ही टीका वाचल्याने मूढ म्हणजेच जड बुद्धि असेल त्यालाही ज्ञान होते आणि जो मूर्ख असेल म्हणजे ज्ञान असूनही योग्यप्रकारे वापरत नाही त्यालाही योग्य ज्ञान होते. एवढेच नाही तर जनाबाई म्हणतात जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याला मी लोटांगण घालते. असे प्रवचन करताना ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी त्यांच्या वाकपुष्पातून
श्रोत्यांना मार्गदर्शन केले
पुढे बोलताना त्यांनी आपला वाक पुष्पातून सांगितले की, जन्माला येऊन माणसाने काय करावे ? जन्माला येण्याचा त्याचा हेतू काय ? तर राजकीय ,सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक हेतू डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची किती कर्तव्यता कोणत्या कारणाने होऊ शकते. याचा विचार करून माणसाने आपले जीवन अखीव- रेखीव अशा पद्धतीने स्वीकारावं माणसाच्या जीवनाला काही नियम असतात ते धर्माचे नियम असतील विचारांचे नियम असतील ते निष्ठेचे नियम असतील परंतु नियमांमध्ये बद्ध असणे हे मानवी जीवनाचे लक्षण आहे. मनुष्य सोडला तर कोणताही प्राणी नियमात राहताना दिसत नाही, जिकडे दिशा मिळेल तिकडे जाण ही त्याची गती असते. परंतु मानवी जीवन हे वेगळे असते, अलीकडे माणसाला नियमात राहणे नकोसे झालेले आहे कारण नियम म्हटले की बंधन आली. तर माणसाला बंधन नकोसे आहे. परंतु आपण माणसाने नियमात राहिलं पाहिजे बंधनातच राहिला पाहिजे. नाहीतर प्राण्यांप्रमाणे त्याच्या वागण्यात स्वैराचार असला तर मानवी जीवन आणि प्राण्यांचे जीवनात काय अंतर राहील तसेच आहार ,निद्रा ,भय ,मैथुनाच्या ,सामान्य, भयतात पशूभै नारायणम ! हे भरधारीच्या वाक्य आपल्याला हेच सुचवत असते की आहार , भय, मैथुन, निद्रा हे प्राण्यांच्या ठिकाणी समान आहे. त्याला बंधन नाही, कुठला आहार घ्यावा याला विचार लागतो म्हणूनच आपण कुठल्या नियमात व विचारात बंधनात आहोत. हे माणसाकडूनच शक्य आहे उदाहरण जीजी थोर महापुरुष मंडळी झाली त्यांनी आपापल्या श्रेष्ठ विचार व आचरणा ला महत्त्व देवून जीवन चरित्रात त्याचा वापर करून समाजाला योग्य दिशा व मार्ग दाखवण्याचं योगदान दिल आहे. आज त्यांच्या आदर्शावरूनच पुढच्या पिढ्या वाटचाल करीत आहेत. याचा विचार केला तर ही मंडळी मोठी झाली ती नियम व बंधन लावूनच, मंडळी एका नियमात राहिली विचारांच्या बाहेरचा त्यांनी कधीही स्वीकारलं नाही एका विशिष्ट नियमात त्यांनी स्वतःला बांधून घेतले म्हणून ते थोर मंडळी जगा वेगळी व आदर्श निर्माण करणारी ठरली आहेत. म्हणून याच नियमांना आदर्श मानवी जीवन म्हटले जाते. “वारी चुकू न दे हरी” तसेच “नामा म्हणे केशव राजा नेम चालवी माझा” अशा पद्धतीच्या ज्या अपेक्षा व प्रार्थना संतांनी परमेश्वराकडे केलेला आहेत. त्यावरून कळते की नेम चालवी हा आग्रह कशाकरिता आहे “माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी” हा नियम कशाकरिता आहे “वारी चुकू न दे हरी” ही प्रार्थना करण्याचं कारण काय याचं हे उत्तर आहे की जरी नियमातून प्राप्त होण्याच्या फलाची आता जीवनात आवश्यकता राहिलेली नसली तरी सुद्धा त्या नियमांमध्ये बद्ध राहणे त्यांना आनंददायी वाटतं. त्यामुळे ते वेष्टी आणि समष्टी अशा दोन्ही जीवनाच्या कल्याणाकरता त्यांना आवश्यक वाटत असतं म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं जीवन कसं असावं त्याची आखीव रेखीवता काय असावी हे आपल्याला ठरविता आलं पाहिजे. जोपर्यंत रेखीव होत नाही , आखीव होत नाही तोपर्यंत जीवन सुंदर होत नाही ते जीवन सहज होत नाही त्याला जीवनातून आनंद मिळविता येत नाही. पण जीवनामध्ये भौतिक रूपाने प्राप्त झालेली संपन्नता ही समाधानाची उत्पादन ठरत नसते समाधानाचा अंतर आणि व्याख्या यातला अंतर मिटला पाहिजे आपले जीवन बद्ध होण्याकरता आपल्याला काही नियम घालून घ्यावे लागतात. आपण काय केलं पाहिजे याचा विचार संत महात्मे सांगत असतात म्हणून आपल्या जीवनाची धन्यता व्हावी यासाठी आपण एका नियमात राहावं यासाठी जनाबाई सांगतात “वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी” आपण ज्ञानेश्वरी वाचावी आपण डोळ्याने पंढरी पहावी असे जनाबाई यांचे म्हणणे आहे डोळा पहावी पंढरी हे केवळ ज्ञानेश्वरी वाचल्याचे फलित म्हणून म्हटले आहे तर ज्ञान होय अज्ञानाची याचा अर्थ तो टिकेला मिळालेला वर आहे आणि त्याच वराने येणे बरे होय ज्ञानदेव सुखिया झाला या वराने ज्ञानदेव संतुष्ट झाले हा वर टीकेला आहे. तर का वाचावी ज्ञानेश्वरी कारण ही ज्ञानेश्वरी वाचली तर सामान्यांना ज्ञान होईल परंतु ज्ञान होईल मुढा आणि मूर्ख त्या दगडा याच्या करता वाचावी ज्ञानेश्वरी का वाचावी अज्ञानाला ज्ञान होतं म्हणून मुर्खाला ज्ञान होतं म्हणून दगडाला ज्ञान होतं म्हणून या तिन्ही ला एकच फलित आहे त्याचे फलित म्हणजे अति मूर्खाला ज्ञान होत असेल हेच त्याचे फलित आहे म्हणून जनाबाई सांगतात ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे कारण माणसाला सांगावं लागतं की चांगलं आणि वाईट काय आहे. त्यामुळे संतांना सांगावं लागतं की काय करावं आणि काय नाही. यासाठी जनाबाई अभंगाद्वारे सांगतात की “वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी” अशाप्रकारे पहिल्या दिवसाच्या वाचावी ज्ञानेश्वरी प्रवचनातून ह भ प चैतन्य चैतन्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृततुल्य वाणीतून त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले.