पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या युवकांना नगरसेवक निलेश शिरसाट यांचेकडून साहित्य गिफ्ट
मुक्ताईनगर : शहरातील ‘श्री कॉलनी’ मधील काही युवक पोलीस भरती सरावासाठी लागणारा गोळा फेक साठी “गोळा” मिळावा मागणी नगरसेवक निलेश शिरसाट यांच्याकडे केली असता शिरसाट यांनी तात्काळ स्वखर्चातून 7.5 किलोचा नवीन गोळा उपलब्ध करून दिला. व सर्वांना पोलीस भरती साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अविनाश वाघ, हर्षल खेळकर, गितेश कत्रे, योगेश बढोले यांच्यासह असंख्य तरुण उपस्थित होते.