पिंप्राळयाचे ‘वैभव’ पूर्णाने
गिळले, गावावर शोककळा
कुर्हा काकोडा ता.मुक्ताईनगर :: येथून जवळच असलेल्या पिंप्राळा येथील दहावीचा विद्यार्थी वैभव विजय झाल्टे वय [१६]पुर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सांयकाळी घडली यामुळे संपूर्ण गांवासह पंचक्रोशीत शोककळा पसरली.
याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील शेतकरी विजय झाल्टे यांचा मुलगा याने यावर्षी दहावीचे पेपर दिले असून निकाल येणे बाकी आहे याआधीच दुर्दैवी अशी घटना घडली मंगळवारी दि.[१४] शेतकरी विजय झाल्टे आपल्या शेतात नांगरटी करीत होते दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत वैभव घरीच होता मात्र वैभव आणि त्याचा मित्र शेतात ट्रॅक्टर ने नांगरटी सुरू आहे म्हणून शेतात गेले थोड्यावेळ थांबल्यानंतर वडीलांना सांगितले घरी जातो मात्र घरी न जाता शेतीपासून अवघ्या पंधरा ते विस फुट अंतरावर असलेल्या पुर्णा नदीकाठावर गेले आणि पोहण्यासाठी कपडे काढून पुर्णा नदीच्या पात्रात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने वैभव हा पाण्यात बुचकाळ्या खाऊ लागला त्याच्या मित्राने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र ते फळाला आले नाही त्याने धावपळ करून शेतात असलेल्या वैभव च्या वडीलांना सांगितले वैभव चे वडील विजय झाल्टे क्षणांचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन पाण्यात उडी घेऊन वैभव ला एकाच उडीत बाहेर काढले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.
गावासह शाळेतील लाडला
“वैभव हा शिवाजी हायस्कूल कुर्हा या शाळेचा विद्यार्थी होता त्याचा स्वभाव मनमोकळा होता आणि शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून त्याची गणना होत होती यावर्षी त्याने दहावीचे पेपर दिले आहे मात्र निकाल बाकी आहे.काही दिवसांपूर्वीच शिक्षक वृंद गावात आले असता वैभव ला घेऊन ते गावात शाळा प्रवेशासाठी फिरले त्याचा हसरा चेहरा मनमिळाऊ स्वभावाने तो सर्वांचाच लाडला होता.मात्र काळ असा आला पिंप्राळ्याचे ‘वैभव’ पुर्णा ने गिळले.”
गावात चुल पेटली नाही.
वैभव ची वार्ता गावात पसरताच एकच खळबळ उडाली आणी संपूर्ण गांवावर शोककळा पसरली मंगळवारी संध्याकाळी एकाही घरी चुल पेटली नाही.
वैभव हा पिंप्राळा गावचे माजी पोलीस पाटील स्व.रघुनाथ पाटील यांचा नातू होता तर माजी सरपंच विष्णू झाल्टे यांचा पुतण्या होता.