पत्रकार दिन : मुक्ताईनगर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त पत्रकारांतर्फे अभिवादन !
मुक्ताईनगर : महाराष्ट्र शासनाने ‘पत्रकार दिन’ हा 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य असून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी दि.६ जानेवारी रोजी मुक्ताईनगर पत्रकार बहुद्देशीय संघाच्या वतीने जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मतीन शेख (लोकमत) , शरद बोदडे (देशदूत), संदीप जोगी(जनशक्ती), प्रवीण भोई (पुण्यनगरी), दीपक चौधरी(सकाळ), मुकेश महल्ले (पुण्यप्रताप), महेंद्र पाटील (तरुण भारत), संतोष मराठे(मुक्ताई वार्ता), अमोल वैद्य (साईमत), सजीव वाडीले (दिव्य मराठी), मोहन मेढे (लोकशाही) , राजेश पाटील(गावकरी), देवेंद्र काटे(लोकशाही) आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
“मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले. त्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरणपर्व या हेतुने ६ जानेवारी हा दिवस पत्रकारिता दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो.”