नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली।
ऐशी ऐकी बोली बोलतो जीव ।।१।।
संत मुक्ताई अभंग
पंढरपूर महात्म्यपर
नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली।
ऐशी ऐकी बोली बोलतो जीव ।।१।।
उगेची मोहन धरूनी प्रपंची।
त्याशी पै यमाची नगरी आहे।।२।।
जिवजंतू जडत्वासी उपदेशी |
त्यासी गर्भवासी घाली देव ||३||
मुक्ताई उपदेशी निवृत्ती ।
संसार पुढती नाही आम्हा ||४||