नवरात्री महोत्सवात आमदारांचे हस्ते माता जगदंबेची महा आरती
आई तुळजा भवानी मित्र मंडळाच्या “श्री केदारनाथ मंदिराच्या आरास ने वेधले लक्ष
मुक्ताईनगर : येथील शिवरायनगर मधील आई तुळजा भवानी मित्र मंडळाच्या वतीने भव्य मंदिरांच्या आरास उभारून नवरात्री महोत्सवात दरवर्षी नवचैतन्य आणून भक्तिमय वातावरण निर्माण केले जाते. या मंडळांचे प्रेरणास्थान आमदार चंद्रकांत पाटील असून या मंडळाला शिवसेनेची देवी म्हणून ओळखले जाते. यंदा या मंडळाने देशातील लाखो करोडो शिव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या “श्री केदारनाथ मंदिराची आरास उभारून येथे माता जगदंबेची स्थापना करण्यात आलेली आहे. येथे दांडीया रास , सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. भव्य दिव्य आरास दरवर्षी उभारल्या जात असल्याने या माध्यमातून भाविकांची प्रचंड वर्दळ असते.

आज सोमवारी दि.३ ऑक्टबर २०२२ ला आमदार चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक मंडळाला भेट देवून महा आरती केली. पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
